शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

शेतकऱ्याच्या खात्यातून पीककर्जाचे १.७५ लाख रुपये उडविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:59 IST

खापरखेडा येथील घटना : चलाखीने एटीएम कार्डची अदलाबदली

लोकमत न्यूज नेटवर्कखापरखेडा : शेतकऱ्याने ४० एकर शेतीची पेरणी व पिकाच्या मशागतीसाठी बँकेकडून पीककर्ज घेतले. पैशाची गरज असल्याने त्याने खापरखेडा (ता. सावनेर) येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून रक्कम काढण्याचा प्रयत्न केला; मात्र रक्कम निघाली नाही. चौकशीअंती त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ७५ हजार रुपयांची परस्पर उचल करण्यात आली असून, यासाठी त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करण्यात आला. त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदली खापरखेडा येथेच झाल्याचे उघड झाले आहे.

मनीष नामदेव वाघ, रा. सुभाषनगर, नागपूर यांची मनसर (ता. रामटेक) शिवारात पाच एकर शेती आहे. त्यांनी यावर्षी इतर शेतकऱ्यांची ४० एकर शेती ठेक्याने केली आहे. पेरणी आणि पिकाच्या मशागतीसाठी पैसे कमी पडत असल्याने त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या रामटेक शाखेकडून १ लाख ३५ हजार रुपयांचे पीककर्ज घेतले होते. त्यामुळे त्यांच्या खात्यात एकूण २ लाख १५ हजार रुपये जमा होते. 

ते मंगळवारी (दि. १७) मनसरहून पारशिवनी, खापरखेडा मार्गे नागपूरला जात होते. खापरखेडा येथे आल्यावर ते रक्कम काढण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या एटीएम रूममध्ये गेले. आतील दोन्ही मशीनमधून रक्कम न निघाल्याने ते बाहेर आले. काही वेळाने त्यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने १ लाख ७५ हजार रुपयांची उचल केल्याचे मॅसेज त्यांच्या फोनवर प्राप्त झाले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी रामटेकच्या बँकेतून ट्रांजेक्शन सर्टिफिकेट घेतले व तक्रार दाखल केली. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या घटनेचा सायबर सेल समांतर तपास करीत आहे. 

असे बदलले कार्डएटीएम रूममधून बाहेर पडताच चार अनोळखी तरुण मनीषजवळ आले. यातील एकाने त्यांना बाजूच्या मशीनमध्ये पैसे असल्याचे सांगून रक्कम काढण्याची सूचना केली. मनीष यांनी एका मशीनमध्ये कार्ड टाकून रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एक व्यक्ती बाजूच्या मशीनजवळ उभी होती. त्याचवेळी मागे उभ्या असलेल्या व्यक्तीने त्यांना पैसे निघाले का, अशी विचारणा केली. त्यांनी मागे वळून बघताच बाजूला असलेल्या व्यक्तीने मशीनमधील मनीष यांचे कार्ड स्वतःकडे ठेवून स्वतः जवळचे कार्ड मशीनमध्ये टाकले आणि त्यांच्या कार्डचा पिन नंबर लक्षात ठेवला.

आठ ट्रांजेक्शनद्वारे रकमेची उचलमनीष वाघ खापरखेड्याहून कोराडीला पोहोचेपर्यंत त्यांच्या खात्यातून पाच ट्रांजेक्शनद्वारे प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे ५० हजार रुपयांची उचल करण्यात आली. मॅसेज प्राप्त होताच त्यांनी बँकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला. तोपर्यंत त्यांच्या खात्यातून प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे दोन ट्रांजेक्शनद्वारे एक लाख रुपये व नंतर तिसऱ्या ट्रांजेक्शनद्वारे २५ हजार रुपये असे एकूण १ लाख २५ हजार रुपये वीरेंद्र सिंग नामक व्यक्तीच्या बँक खात्यात वळते केले. शेवटी मनीष यांनी त्यांच्या खात्यात शिल्लक राहिलेले ४० हजार रुपये त्यांच्या पत्नीच्या खात्यात जमा केले.

टॅग्स :nagpurनागपूरfraudधोकेबाजीFarmerशेतकरी