नागपुरात आरपीएफने पकडला ४.२४ लाखाचा गांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 22:28 IST2020-07-30T22:27:20+5:302020-07-30T22:28:33+5:30

रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून ४ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा ४२.४८० किलो गांजा जप्त केला आहे.

RPF seizes 4.24 lakh ganja in Nagpur | नागपुरात आरपीएफने पकडला ४.२४ लाखाचा गांजा

नागपुरात आरपीएफने पकडला ४.२४ लाखाचा गांजा

ठळक मुद्दे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून ४ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा ४२.४८० किलो गांजा जप्त केला आहे.
रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक रवी जेम्स, उपनिरीक्षक एस. पी. सिंह बुधवारी सायंकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर गस्त घालत होते. त्यांना इटारसी एण्डकडील भागात ठेवलेल्या पार्सलमधून गांजासारखा उग्र वास आला. तेथे तीन पोते ठेवलेले होते. तेथील पार्सल क्लर्कला विचारणा केली असता त्याने खासगी हमालांनी हे पोते रेल्वेगाडी क्रमांक ०२८०५ मधून चुकीने उतरविले असून हे पोते नागपूरचे नसल्याची माहिती दिली. तेथे सहायक सुरक्षा आयुक्त कोटा जोजी व पंचासमक्ष पोत्यांची तपासणी केली. त्यात २० पाकिटात ४ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा ४२.४८० किलो गांजा आढळला. जप्त केलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. ही कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Web Title: RPF seizes 4.24 lakh ganja in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.