पारशिवनी शहरात पाेलिसांचा रूट मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:08 IST2021-04-16T04:08:45+5:302021-04-16T04:08:45+5:30
पारशिवनी : काेराेना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करावे, यादृष्टीने गुरुवारी (दि. १५) पारशिवनी शहरात पाेलिसांनी रूट ...

पारशिवनी शहरात पाेलिसांचा रूट मार्च
पारशिवनी : काेराेना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करावे, यादृष्टीने गुरुवारी (दि. १५) पारशिवनी शहरात पाेलिसांनी रूट मार्च केला.
काेराेना संक्रमण राेखण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, बाजारात गर्दी करू नये, काम नसताना राेडवर फिरू अथवा सार्वजनिक ठिकाणी गटा-गटाने गप्पा करत उभे राहू नये, बाजारात अथवा दुकानात खरेदी करतेवेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, घराबाहेर पडल्यानंतर मास्कचा नियमित वापर करावा, कुठल्याही वस्तूला विनाकारण स्पर्श करू नये अथवा कुठेही थुंकू नये, हात साबणाने वारंवार धुवावेत अथवा सॅनिटाईझ करावेत, असे आवाहन यावेळी पाेलिसांनी केले. या उपाययाेजनांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.
स्थानिक पाेलीस ठाण्याच्या आवारातून या रूट मार्चला सुरुवात करण्यात आली. हा रूट मार्च पारशिवनी शहरातील सावनेर रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, बाजार ओळीमार्गे भ्रमण करीत परत पोलीस ठाण्याच्या आवारात दाखल झाला. यात ठाणेदार संतोष वैरागडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा पळनाटे, संदीप उबाळे, ज्ञानेश्वर चिमूरकर यांच्यास २२ पोलीस व १५ होमगार्ड सहभागी झाले हाेते.