शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

राजभवनातील गुलाब ठरले राजा आणि राजकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:11 AM

राजभवनातील ‘बहुरूपी’ या गुलाबाने किंग ऑफ रोजेसचा पुरस्कार पटकावला. तर क्वीन ऑफ रोझेस हा पुरस्कार ‘लेडी रोझ’ या गुलाबासाठी दुधलवार यांनी पटकावला. तसेच प्रिन्स ऑफ रोझेस हा पुरस्कार ‘वेटेरान्स ऑनर’ या गुलाबाकरिता राजभवनाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना मिळाला.

ठळक मुद्देविधानभवनातील पुष्प प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवने व उद्याने विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विधानभवन परिसरात पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यंदा राजभवनातील ‘बहुरूपी’ या गुलाबाने किंग ऑफ रोजेसचा पुरस्कार पटकावला. तर क्वीन ऑफ रोझेस हा पुरस्कार ‘लेडी रोझ’ या गुलाबासाठी दुधलवार यांनी पटकावला. तसेच प्रिन्स ऑफ रोझेस हा पुरस्कार ‘वेटेरान्स ऑनर’ या गुलाबाकरिता राजभवनाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना मिळाला. प्रिन्सेस ऑफ रोझ हा पुरस्कार ‘चार्ल्स अझनवार’ या गुलाबाकरिता हिस्लॉप कॉलेजने पटकावला.दोन दिवसीय प्रदर्शनामध्ये विविध रंगांचे गुलाब, झेनिया, झेंडू, जरबेरा यांच्यासह अनेक आकर्षक फुलांची सुंदर आरास होती. फुलांचा राजा गुलाब मोहवणारा असतोच, मात्र काटेरी निवडुंगसुद्धा अत्यंत आकर्षक दिसत होते. ताजी व टवटवीत फुले व त्यांच्या विविध आकर्षक रचना या प्रदर्शनात मांडल्या आहेत. हंगामी फुले, शोभिवंत फुलझाडे, लँडस्केप ऑन द स्पॉट व उद्यान स्पर्धा या विविध विभागातून ८०० प्रवेशिका आल्या होत्या. एकूण ५१ स्पर्धकांनी भाग घेतला; सोबतच औषधी वनस्पती, कुंड्यांमध्ये माहितीसह ठेवण्यात आले हेते. रेखा शरद देशमुख यांना या प्रदर्शनात सर्वात जास्त पुरस्कार मिळाले. बक्षीस वितरण मुख्य अभियंता उल्लास देबडवार यांच्या हस्ते व विद्याधर सरदेशमुख यांच्या उपस्थितीत पार पडले.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनnagpurनागपूर