दुर्दैवी... पाळण्याची दोरी बनली फास; छोट्या भावाशी खेळताना मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 11:10 AM2019-09-23T11:10:23+5:302019-09-23T11:13:02+5:30

नऊ वर्षीय चिमुकल्याचा पाळण्यावर खेळता खेळता गळफास लागून मृत्यू झाला. बाराद्वारी कापसी खुर्द येथे शनिवारी रात्री ७ च्या सुमारास उघड झालेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

The rope became a death trap; accident in Nagpur district | दुर्दैवी... पाळण्याची दोरी बनली फास; छोट्या भावाशी खेळताना मुलाचा मृत्यू

दुर्दैवी... पाळण्याची दोरी बनली फास; छोट्या भावाशी खेळताना मुलाचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देचिमुकल्याच्या मृत्यूने कापसीत शोककळापारडीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रकृती चांगली नसल्याने छोट्या भावावर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या अवतीभवती खेळणाऱ्या नऊ वर्षीय चिमुकल्याचा पाळण्यावर खेळता खेळता गळफास लागून मृत्यू झाला. बाराद्वारी कापसी खुर्द येथे शनिवारी रात्री ७ च्या सुमारास उघड झालेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मोहित नरेंद्र ढोरे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
मोहितचे आई-वडील अत्यंत गरीब आहेत. ते मोलमजुरी करतात. मोहित गावातील शाळेत शिकत होता. त्याला एक लहान भाऊ असून, त्याची प्रकृती चांगली नसल्यामुळे शाळेतून आल्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी मोहितवर सोपवून त्याचे आई-वडील शनिवारी कामाला निघून गेले. रात्री ७ च्या सुमारास मोहितची आई घरी परतली तेव्हा तिला मोहित पाळण्याच्या दोरीला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. तिने किंकाळी फोडल्यामुळे आजूबाजूची मंडळी धावून आली. पाळण्याच्या दोरीने लागलेला मोहितचा गळफास काढून शेजाऱ्यांनी त्याला मेयोत नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती कळताच पारडी पोलीस ठाण्याचे हवालदार मुरलीधर ठोंबरे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

अशी घडली असावी घटना
तब्येत बरी नसलेल्या भावाच्या शेजारी मोहित खेळत होता. तो पलंगावर पाय ठेवून पाळण्याच्या दोरीला लटकून झोके घेत असावा, त्याचा पाय घसरून पाळणा उलटा फिरल्याने दोरी त्याच्या गळ्याभोवती आवळली गेली असावी आणि निरागस मोहित त्यातून सुटका करून घेण्यासाठी धडपड करीत असताना फास घट्ट होत गेला असावा, असा या घटनेच्या संबंधाने पोलिसांचा कयास आहे.

Web Title: The rope became a death trap; accident in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू