तडीपार असताना शहरात फिरला, अन्नू काल्या तुरुंगात पोहोचला
By दयानंद पाईकराव | Updated: May 24, 2024 15:58 IST2024-05-24T15:57:40+5:302024-05-24T15:58:26+5:30
Nagpur : तडीपार असताना देखिल शहरात फिरणाऱ्या आरोपीला अटक

Roaming the city at dawn, Accuse arrested
नागपूर : तडीपार असताना देखिल शहरात फिरणाऱ्या आरोपीला नंदनवन पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत उर्फ अन्नू काल्या जगदिश बडोदे (२४, रा. नंदनवन झोपडपट्टी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नंदनवन पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार गुन्हेगारांच्या शोधात गुरुवारी रात्री ९.४५ वाजता गस्त घालत होते.
तेवढ्यात त्यांना तडीपार असलेला अन्नू काल्या फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे पोहोचले असता अन्नू काल्या पोलिसांना पाहून पळून जात होता. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याचा अभिलेख तपासला असता त्याला झोन ४ च्या पोलिस उपायुक्तांनी १५ जून २०२३ पासून दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार केल्याचे दिसले. तडीपार असताना शहरात फिरत असल्यामुळे आरोपी अन्नू काल्या विरुद्ध कलम १४२ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.