नागपुरात नदी स्वच्छता अभियान अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 07:55 PM2020-05-11T19:55:50+5:302020-05-11T19:59:50+5:30

शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नदी स्वच्छता अभियानाला महापालिकेतर्फे दरवर्षी मे महिन्यात सुरुवात केली जात होती. परंतु यावर्षी मार्च महिन्यात सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे एकाच वेळी तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेला सुरूवात करण्यात आली.

River cleaning campaign in Nagpur in final stage | नागपुरात नदी स्वच्छता अभियान अंतिम टप्प्यात

नागपुरात नदी स्वच्छता अभियान अंतिम टप्प्यात

googlenewsNext
ठळक मुद्दे२० मेपर्यंत काम पूर्ण होण्याची आशा : नालेसफाई ३० मेपर्यंत चालणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नदी स्वच्छता अभियानाला महापालिकेतर्फे दरवर्षी मे महिन्यात सुरुवात केली जात होती. परंतु यावर्षी मार्च महिन्यात सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे एकाच वेळी तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेला सुरूवात करण्यात आली. नदी स्वच्छतेचे काम अंतिम टप्प्यात असून २० मेपर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. शहरातील नालेसफाईच्या कामालाही गती असून असून ३१ मेपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.
नागपूर महापालिका दरवर्षी लोकसहभागातून नदी स्वच्छता अभियान राबविते. याअंतर्गत शहरातील नागनदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीची स्वच्छता करण्यात येते. पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होऊ नये, प्रवाह चांगला होऊन वस्त्यांमध्ये पाणी शिरू नये, हा त्यामागील उद्देश असते. पावसाळ्याच्या तोंडावर होणारे दरवर्षीचे काम यंदा मात्र दोन महिने अगोदर सुरू झाले आहे.
दरवर्षी नदी स्वच्छता मोहीम राबविताना नदीतील गाळ हा नदी पात्रालात बाजूला टाकला जात होता. मात्र यावषीं नदीपात्रातील गाळ बाहेर काढून तो शहरातील खोलगट वा पाणी साचणाºया भागात टाकला जात आहे. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात सखल भागात पाणी साचणार नाही. तसेच पावसाळ्यात नद्यांचे पाणी लगतच्या वस्त्यात शिरणार नाही. यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.
खोलीकरण व रुंदीकरणामुळे नद्यांचे र्सौदर्य फुलण्याला मदत होणार आहे. अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. या नद्यांच्या स्वच्छतेसोबतच शहरातील दहा झोन अंतर्गत येणाºया सुमारे २२७ नाल्यांची स्वच्छता केली जात आहे. त्यापैकी पाचझोनमधील १३३ नाल्यांच्या स्वच्छतेला एप्रिल महिन्यात सुरुवात झाली. मनपा तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. ३१ मेपर्यंत शहरातील संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा त्यांचा मानस आहे.

१० झोनमध्ये २२७ नाले
मनपा हद्दीतील १० झोनमध्ये २२७ नाले आहेत. लक्ष्मीनगर झोनमध्ये २२, धरमपेठ ३५, हनुमाननगर १४, धंतोली १४, नेहरुनगर १५, गांधीबाग ५१, सतरंजीपुरा झोनमध्ये २२, लकडगंज सात, आशीनगर १८ आणि मंगळवारी झोनमध्ये २९ नाले आहेत. यापैकी ७१ नाल्यांची पोकलेनद्वारे स्वच्छता करण्यात येणार आहे. जेथे पोकलेन जाऊ शकत नाही अशा उर्वरित नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे केली जात आहे.

Web Title: River cleaning campaign in Nagpur in final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.