दिवसभर रिपरिप, नागपूर, भंडारा सर्वाधिक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 22:15 IST2021-07-30T22:14:50+5:302021-07-30T22:15:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार नागपूरसह विदर्भात शुक्रवारी सर्वत्र पावसाची रिपरिप दिवसभर सुरू हाेती. रात्रीही पावसाचा ...

दिवसभर रिपरिप, नागपूर, भंडारा सर्वाधिक पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार नागपूरसह विदर्भात शुक्रवारी सर्वत्र पावसाची रिपरिप दिवसभर सुरू हाेती. रात्रीही पावसाचा जाेर कायम हाेता. नागपुरात सकाळपर्यंत २३.८ मिमी व दिवसभरात १५.४ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. त्या खालाेखाल भंडारा जिल्ह्यात २१.४ मिमी पाऊस नाेंदविला गेला.
पावसाळी वातावरणामुळे नागपूरचे तापमान ४.७ अंशाने घटले. दिवसभरात २५.६ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. विशेष म्हणजे दिवसा व रात्रीच्या तापमानात केवळ १.६ अंशाचा फरक राहिला. २४ अंश किमान तापमानाची नाेंद करण्यात आली. शहरात सकाळी ६ वाजतापासून पावसाला सुरुवात झाली. सकाळी ८.३० पर्यंत २३.८ मिमी पाऊस नाेंदविला गेला. दुपारी पुन्हा पावसाने जाेर धरला. जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत ५७९.२ मिमी पावसाची लाेंद करण्यात आली आहे. म्हणजे मानसून हंगामाचा ६० टक्के पाऊस या दाेन महिन्यात झाला आहे. दरम्यान विदर्भातील वर्धा, बुलढाणा, वाशिम वगळता सर्व जिल्ह्यात कुठे जाेरदार तर कुठे तुरळक पाऊस झाला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने त्याचा प्रभाव विदर्भासह मध्य भारतात हाेत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ तास आकाशात ढग कायम राहतील आणि येते दाेन-तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार पाऊस हाेण्याचा अंदाज व्यक्त केला. विदर्भातील इतर जिल्ह्यामध्ये अकाेला ७.३ मिमी, अमरावती ६.४ मिमी, बुलढाणा २.८ मिमी, वाशिम ५.२ मिमी व यवतमाळ २.९ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली.
विभागातील पाऊस
जिल्हा आजचा पाऊस आतापर्यंतची नाेंद
नागपूर २३.८ मिमी ५७९.२ मिमी
वर्धा १.५ ५०६.९
भंडारा २१.४ ५७२.१
गाेंदिया ११.४ ५४१.६
चंद्रपूर ०.७ ७६९.४
गडचिराेली ३.५ ६१२.१
विदर्भातील प्रमुख प्रकल्पाचा जलसाठा
प्रकल्प आजचा साठा (दलघमी) टक्के
काटेपुर्णा ६६.०८ ६३.४२
उर्ध्व वर्धा ४३८.२८ ५७.४५
खडकपूर्णा ७९.१५ ५६.०५
बेंबळा १४२.४३ ६६.८९
इसापूर ९५८.५९ ६६.७६
अरुणावती १४५.३६ ६८.७५
नागपूर विभाग
गाेसी खुर्द ७२१.३२ ४२.६१
बावनथडी १३० ३०.८७
आसाेलामेंढा ४८.०३ ७१.४४
सिरपूर २९.८९ ११.६२
ईटियाडाेह १५७.६८ २९.५६
ताेतलाडाेह ७९३.९९ ६३.३३
खिंडसी ३४.३२ ३३.३२
वडगाव ९९.०१ ६१.१६
नांद ३१.८४ ४२.९५
कामठी खैरी १२५.७९ ६१.१३