माहितीचा अधिकार : एसबीआयकडे २८५२.६६ कोटी रुपये दावाहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 20:11 IST2019-06-11T20:09:53+5:302019-06-11T20:11:06+5:30

ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. देशातील आघाडीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडे तब्बल २८५२.६६ कोटी रुपये दावाहीन पडून आहे. या रकमेवर अधिकार सांगायला कुणीही पुढे आलेले नाही. सदर रक्कम १ कोटी ८ लाख ८६ हजार ४८५ खात्यांमध्ये जमा आहे. ही आकडेवारी ३१ मार्च २०१९ पर्यंतची आहे.

Right to Information: SBI has unclaims Rs.2852.66 crores of rupees | माहितीचा अधिकार : एसबीआयकडे २८५२.६६ कोटी रुपये दावाहीन

माहितीचा अधिकार : एसबीआयकडे २८५२.६६ कोटी रुपये दावाहीन

ठळक मुद्दे३१ मार्च २०१९ पर्यंतची आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. देशातील आघाडीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडे तब्बल २८५२.६६ कोटी रुपये दावाहीन पडून आहे. या रकमेवर अधिकार सांगायला कुणीही पुढे आलेले नाही. सदर रक्कम १ कोटी ८ लाख ८६ हजार ४८५ खात्यांमध्ये जमा आहे. ही आकडेवारी ३१ मार्च २०१९ पर्यंतची आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती पुरविण्यात आली आहे. त्यांना देण्यात आलेल्या अन्य माहितीनुसार, ३१ मार्च २०१९ पर्यंत एसबीआयने प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत एकूण १० कोटी ९७ लाख ७८ हजार ७७५ खाते उघडले. या खात्यांमध्ये एकूण २३ हजार १६३.३७ कोटी रुपये जमा होते. तसेच, १ कोटी २५ लाख २८ हजार ४५ शून्य जमा खाते उघडण्यात आले.
सीएसआरवर ६.२४ कोटी खर्च
बँकेने गेल्या आर्थिक वर्षात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)करिता ६.२४ कोटी रुपये खर्च केले. पहिले दहा डिफॉल्टर्स, थकित कर्ज, यासंदर्भात करण्यात आलेली कारवाई यासह अन्य काही माहिती बँकेने गोपनियतेच्या कारणावरून पुरवली नाही.

Web Title: Right to Information: SBI has unclaims Rs.2852.66 crores of rupees