नागपूरच्या महारॅलीतच दिसला देवरा व राहुल गांधी यांच्यात दुरावा

By कमलेश वानखेडे | Published: January 14, 2024 01:30 PM2024-01-14T13:30:00+5:302024-01-14T13:30:39+5:30

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी असलेला दुरावा यावेळी दिसून आला.

rift between milind deora and rahul gandhi was seen in the nagpur rally | नागपूरच्या महारॅलीतच दिसला देवरा व राहुल गांधी यांच्यात दुरावा

नागपूरच्या महारॅलीतच दिसला देवरा व राहुल गांधी यांच्यात दुरावा

कमलेश वानखेडे, नागपूर: काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित 'है तयार हम' या महा रॅलीमध्ये काँग्रेसने लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला. या रॅलीत माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी हजेरी लावली, पण काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी असलेला दुरावा यावेळी दिसून आला.

नागपुरातील महारॅलीत राहुल गांधी यांचे आगमन झाले असता मंचावर उपस्थित असलेल्या सर्वच राष्ट्रीय नेत्यांनी राहुल गांधी यांचे स्वागत करीत हितगुज साधले होते. या क्रमात मिलिंद देवरा हे तेवढे सक्रिय नव्हते. रॅलीत मिलिंद देवरा यांचे भाषणही झाले नाही. राहुल गांधी व देवरा यांच्यात दरी वाढत चालली आहे असे या रॅलीतच उपस्थिताना जाणवले.

मात्र या रॅलीच्या काही दिवसातच देवरा यांनी शिवसेनेचा मार्ग धरल्याने काँग्रेसला आधी आपल्या नेत्यांनाच भाजपसोबत लढण्यासाठी तयार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: rift between milind deora and rahul gandhi was seen in the nagpur rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.