शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

रेस्टेलस लेग सिंड्रोम डे; वेळीच लक्ष द्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 9:06 AM

शरीराला व मेंदूला पुरेशी झोप न मिळाल्याने ही व्यक्ती नकळत पाय हलवू लागते व पुढे ती सवय बनते. तसे केल्याने त्या व्यक्तीला चांगले वाटते. कारण त्यामुळे डोपामाईन नावाचे हार्मोन त्याच्यात स्रवत असते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कित्येकदा आपल्यासमोर बसलेली व्यक्ती सतत पाय हलवत रहात असेल तर आपण अस्वस्थ होतो. ती ओळखीची असेल तर आपण पाय स्थिर ठेवण्याबाबत सांगू शकतो अन्यथा दुर्लक्ष करणे एवढेच हातात उरते. बरेचदा एखादी व्यक्ती झोपेतच खूप पाय हलवत असते असंही आपण पाहतो.पण कां बरं जडते अशी सवय एखाद्याला? काय कारणं असतात.. तसे केल्याने त्या व्यक्तीच्या मेंदूत नेमके काय घडत असते.. आणि ही सवय सुटण्यासाठी त्याने काय करावं..आज हे सर्व आठवण्याचे कारण, आज आहे, जागतिक सतत पाय हलवत राहण्याच्या सवयीचा दिवस. रेस्टेलस लेग सिंड्रोम डे.रेस्टलेस लेग सिंड्रोम हा एक मेंदूशी निगडित आजार असल्याचे वैद्यकशास्त्र सांगते. हॉर्वर्ड मेडिकल स्कूल, बोस्टनमधील प्रो. डॉ. डब्ल्यू क्विंकमैन यांच्या मते, अशा व्यक्तीची झोप कमी असते. शरीराला व मेंदूला पुरेशी झोप न मिळाल्याने ही व्यक्ती नकळत पाय हलवू लागते व पुढे ती सवय बनते. तसे केल्याने त्या व्यक्तीला चांगले वाटते. कारण त्यामुळे डोपामाईन नावाचे हार्मोन त्याच्यात स्रवत असते.स्विडनमधील न्यूरॉलॉजीचे प्राध्यापक कार्ल एक्सेल एकबोर्न यांनी १९४५ मध्ये सर्वात प्रथम हा सिंड्रोम स्पष्ट करून दाखवला. त्यानंतर याबाबत बरेच संशोधन झाले. मात्र त्यामागचे निश्चित कारण अद्याप समोर यायचे आहे. जगातील लोकसंख्येच्या सात टक्के लोकसंख्या या आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळेच २३ सप्टेंबर हा दिवस रेस्टलेस सिंड्रोम डे म्हणून पाळला जातो.पाय हलवत राहण्यामागे, वजन अधिक असणे, पुरेशी झोप न घेणे, व्यायाम न करणे, दारू व सिगरेटचे अत्याधिक सेवन आदी कारणे आहेत. तसेच शरीरात लोहची कमतरता असणे हेही एक कारण सांगितले जाते. संशोधकांच्या मते, सतत पाय हलवत राहण्याच्या सवयीमुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो.त्यावर उपचार केला जाऊ शकतो. काही औषधे, पुरेशी झोप, व्यायाम आदी उपचार आहेत.

 

टॅग्स :Healthआरोग्य