शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सोडतीतून निघणार १२ जागांचे आरक्षण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणुक आयोगाने ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. ...

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणुक आयोगाने ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. रिक्त जागांचा लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असे पत्र आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ५० टक्क्यात आरक्षण बसविताना ओबीसीला केवळ १२ जागा येतात. या १२ जागांचे आरक्षण कसे काढणार?, अतिरिक्त ठरणारे चार सर्कल कोणते, असे प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये चर्चिले जात आहे. यासंदर्भात प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा केली असता, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाने अजूनही पुढील प्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले नसले तरी सोडतीतून १२ जागांचे आरक्षण काढण्यात येईल, असे सांगण्यात आले.

नागपूर जिल्हा परिषदेची जानेवारी २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीचे आरक्षण काढताना जिल्हा निवडणुक विभागाने सर्वप्रथम अनुसूचित जाती, त्यानंतर अनुसूचित जमातीचे आरक्षण काढले. या दोन्ही प्रवर्गाचे आरक्षण लोकसंख्येच्या आधारावर काढण्यात आल्याने अनुसूचित जातीसाठी १० सर्कल व जमातीसाठी ७ सर्कल आरक्षित झाले. त्यावेळी राज्य निवडणुक आयोगाने केलेल्या मार्गदर्शनानुसार ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण २७ टक्के काढण्यात आले. नागपूर जिल्हा परिषदेत ५८ सदस्य असून, अनुसूचित जाती व जमातीचे १७ सर्कलचे आरक्षण काढल्यानंतर उरलेल्या ४१ जागांपैकी २७ टक्केनुसार १६ सर्कलसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रशासनातील तज्ञांच्या मते राज्यात ओबीसींना नोकरी आणि शिक्षणात वेगळे व राजकीय आरक्षण वेगळे मिळते. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण ठरवितांना अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण लोकसंख्येच्या आधारे ठरविण्यात यावे, असे स्पष्ट म्हटले आहे. तर ओबीसीचे आरक्षण २७ टक्केपर्यंत देण्यात यावेत असाही उल्लेख आहे. मुळात ओबीसीची जनगणना झाली नसल्याने ओबीसीचे आरक्षण ठरवितांना लोकसंख्येचा आधार घेता येऊ शकत नाही. त्यामुळे रिक्त झालेल्या जागांचे आरक्षण लोकसंख्येच्या आधारावर काढणे अवघड असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.

ईश्वर चिठ्ठी हा पर्याय अन्यायकारक असल्याने आयोगाने ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. पून्हा निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ५० टक्के आरक्षणाच्या श्रेणीत बसविण्यासाठी ओबीसी प्रवर्गाचे १२ सर्कल आरक्षित होणार आहे. उवरित ४ सर्कल खुले करण्यात येणार आहे.