शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

बेजबाबदार अधिकाऱ्यांचा विद्यापीठाकडून बचाव

By admin | Updated: April 8, 2016 03:13 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला जागतिक पातळीवर नेण्याचे दावे प्रशासनाकडून करण्यात येतात.

‘एनआयआरएफ’ला माहिती पाठविलीच नाही : ‘रँकिंग’बाबत उशिरा पत्र मिळाल्याची सबबनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला जागतिक पातळीवर नेण्याचे दावे प्रशासनाकडून करण्यात येतात. परंतु राष्ट्रीय पातळीवरील ‘रँकिंग’साठी साधी माहिती पाठविण्याची तसदीदेखील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घेतली नाही. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘एनआयआरएफ’अंतर्गत (नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क) नागपूर विद्यापीठाला ‘रँकिंग’च न मिळाल्याने नाचक्की झाली आहे. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.‘एनआयआरएफ’तर्फे देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ या आठवड्यात जाहीर करण्यात आले. शिवाजी विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला या यादीत स्थान मिळाले आहे. परंतु ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळूनदेखील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला यात स्थान मिळवता आले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘एनआयआरएफ’बाबत विद्यापीठातील अधिकाऱ्यांना माहितीच नव्हती. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान याबाबत आवाहनदेखील केले होते. शिवाय ‘आॅनलाईन’ माहितीदेखील उपलब्ध नव्हती. ‘एनआयआरएफ’मध्ये माहिती पाठवावी लागणार आहे हे लक्षात येताच याची ‘आॅनलाईन’ नोंदणी करण्यात आली. विद्यापीठाची इत्थंभूत माहिती पाठविण्याची जबाबदारी ‘बीसीयूडी’ संचालक डॉ.डी.के.अग्रवाल यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे दिली. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती वेळेत पाठविलीच नाही. त्यामुळे साहजिकच विद्यापीठाला ‘रँकिंग’ मिळू शकले नाही. याबाबत कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा करण्यात आली असता ‘एनआयआरएफ’चे पत्र विद्यापीठाला उशिरा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पत्र मिळाल्यापासून प्रस्ताव पाठविण्यासाठी केवळ २ दिवसांचा वेळ उपलब्ध होता. तेवढ्या वेळेत विस्तृत स्वरूपातील माहिती सादर करणे शक्य नव्हते असेदेखील ते म्हणाले. यात अधिकाऱ्यांचा कुठलाही दोष नसून कुणावर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)