आंबेडकरवादी राजकारणाच्या पुनर्रउभारणीसाठी 'रिपब्लिकन फेडरेशन' नवीन राजकीय आघाडीचीची घोषणा

By आनंद डेकाटे | Updated: June 11, 2025 20:12 IST2025-06-11T20:10:42+5:302025-06-11T20:12:14+5:30

नेत्यांना वगळून कार्यकर्त्यांची घोषणा : मनपा निवडणुकीच्या मैदानात उतरणार

'Republican Federation' announces new political front for revival of Ambedkarite politics | आंबेडकरवादी राजकारणाच्या पुनर्रउभारणीसाठी 'रिपब्लिकन फेडरेशन' नवीन राजकीय आघाडीचीची घोषणा

'Republican Federation' announces new political front for revival of Ambedkarite politics

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
राज्यात आंबेडकरी समाजाची प्रचंड ताकद आहे. मात्र गटातटात विखुरलेल्या रिपाइंमुळे ही राजकीय ताकद कमी झाल्याचे दिसून येते. रिपाइंची ही ताकद व अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी आणि आंबेडकरवादी राजकारणाच्या पुनर्रउभारणीसाठी समाजातील विविध सामाजिक संघटनांनी व कार्यकर्त्यांनी नेत्यांना वगळून एकत्र येत बुधवारी नागभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत 'रिपब्लिकन फेडरेशन' या नवीन राजकीय आघाडीची ची घोषणा केली. तसेच आगामी मनपा निवडणूकीच्या मैदानात उतरणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.

विविध संघटना व संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत या फेडरेशनला आकार दिला आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी नसलेल्या या कार्यकर्त्यांनी गेल्या आठ महिन्यापासून तयारीला सुरूवात केली होती. सामाजिक कार्यकतें म्हणून ओळख असलेल्या या कार्यकर्त्यांनी फुटीचा इतिहास पुसून, जुन्या रिपब्लिकन पाटींचे वलय स्थापण्यासाठी समाविचारी आघाडी व पक्षांना सोबत या, असे आवाहन केले आहे.

या पत्रकार परिषदेला समता सैनिक दलाचे सुनील सारिपुत्त, प्रकाश दार्शनिक, सामाजिक कार्यर्ते ॲड. मिलिंद पखाले, छाया खोब्रागडे, रिपब्लिकन मुव्हमेंटचे नरेश वाहाणे, विशाल आर्यबोधी, डॉ. एस.के. गजभिये, हंसराज भांगे, ज्योती आवळे, उज्वला गणवीर, भारती सहारे, कल्पना मेश्राम, रंजना वासे, ममता बोदिले, जयश्री गणवीर, मीना शेवडे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

तरूण चेहरे व ५० टक्के महिलांना उमेदवारी
मनपा निवडणूकीत केवळ रिपब्लिकन व समविचारी आघाडीला सोबत घेऊन चांगले व प्रामाणिक चेहरे देण्याचा प्रयत्न करणार आहे. मनपात जनतेच्या मुलभूत प्रश्नासह समाजाच्या प्रश्नासाठीही नवे नेतृत्व उभारण्याचा या निमित्ताने प्रयत्न राहणार आहे. तरूण चेहरे व ५० टक्के महिलांना उमेदवारी देण्याचे फेडरेशनने जाहीर केले आहे. आतापर्यंत फेडरेशनने निर्धार सभा, बैठका घेत अनेकांचे विचार जाणून घेतले. शनिवार १४ जून रोजी फेडरेशनतफें हिंदी मोरभवनातील मधुरम सभागृहात निर्धार सभा आयोजित करण्यात आली आहे.

Web Title: 'Republican Federation' announces new political front for revival of Ambedkarite politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर