शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स कंपनीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा

By admin | Updated: April 8, 2016 03:07 IST

रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने मोबाईल टॉवर उभारण्यासाठी व केबल टाकण्यासाठी शहरात ठिकठिकाणी खड्डे खोदले आहेत.

हायकोर्टात याचिका : खड्ड्यात पडून चिमुकलीचा मृत्यूनागपूर : रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने मोबाईल टॉवर उभारण्यासाठी व केबल टाकण्यासाठी शहरात ठिकठिकाणी खड्डे खोदले आहेत. यापैकी एका पाणी भरलेल्या खड्ड्यात पडल्यामुळे पिंकी सोळंकी या दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रिलायन्स कंपनीचे पदाधिकारी व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात यावे, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.शाहबाज अबरार सिद्धीकी, असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी गुरुवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर गृह विभागाचे प्रधान सचिव, नगर विकास विभागाचे सचिव, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, सीताबर्डी पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक ए.बी. नगारे, रिलायन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय मश्रुवाला, संचालक मंडळाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, मंडळाचे सदस्य महेंद्र नहाटा, मनोज मोदी, आकाश अंबानी व ईशा अंबानी यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.रिलायन्स कंपनी करारातील अटी व शर्तीचा भंग करून केबल टाकण्याचे काम करीत आहे. पूर्वपरवानगीशिवाय काम सुरू केल्यामुळे मनपाने दोनदा कंपनीची बँक हमी जप्त केली आहे. मनपाने कंपनीच्या बँक हमीच्या माध्यमातून २ कोटी १८ लाख ५५ हजार ५५० रुपये प्राप्त केले आहे. पण पिंकीच्या कुटुंबीयांना अद्याप एक रुपया भरपाई देण्यात आली नाही. रोडवरील खड्डे व बांधकाम साहित्यामुळे प्राणघातक अपघात होत आहेत. यासंदर्भात निवेदन सादर करूनही शासनाने काहीच कारवाई केली नाही. रिलायन्स व इतर कंपन्यांच्या केबल टाकण्याच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात यावी, समितीने नियोजन विभागाला आवश्यक कारवाईसाठी अहवाल सादर करावा, केबलच्या कामामुळे पडलेले खड्डे बुजविण्यासाठी मनपाने त्वरित कारवाई करावी, पिंकीच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)