नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या पत्नी व निकटवर्तीयाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 14:39 IST2020-03-13T14:38:45+5:302020-03-13T14:39:07+5:30

कोरोना विषाणूची लागण झालेल्या नागपुरातील रुग्णाच्या पत्नी व भावाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या ३ झाली आहे.

Report of Corona Positive Patient's Wife and relative in Nagpur also Positive | नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या पत्नी व निकटवर्तीयाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह

नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या पत्नी व निकटवर्तीयाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह

ठळक मुद्देअन्य रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोरोना विषाणूची लागण झालेल्या नागपुरातील रुग्णाच्या पत्नी व भावाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या ३ झाली आहे. कोरोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण नागपुरात बुधवारी आढळून आला होता. खबरदारी म्हणून या रुग्णाच्या संपर्कात आलेले त्याचे कुटुंबिय, नातेवाईक, मित्र व त्यांची तपासणी करणारे दोन डॉक्टरांसह त्यांच्याकडे काम करणाऱ्या अशा १७ संबंधितांना तपासणीसाठी गुरुवारी मेयो, मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होतं. गुरुवारी रात्री उशीरा यातील १५ संबंधितांच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला. यात सर्व जण निगेटीव्ह आले. परंतु त्यांच्या ४२ वर्षीय पत्नी आणि ५० वर्षीय निकटवर्तीय पॉझिटीव्ह आले अशी अधिकृत माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना विचारले असता त्यांनी यासंदर्भात प्रतिक्षा करा असे सांगितले.  नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ३ झाली आहे.
नागपुरातील अनेक सामाजिक संस्थांनी आपले कार्यक्रम, मेळावे, आयोजने रद्द केली आहेत.

 

Web Title: Report of Corona Positive Patient's Wife and relative in Nagpur also Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.