शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

२०२३ ची पुनरावृत्ती? अंबाझरी तलाव फक्त २० सेंटीमीटरवर ओव्हरफ्लो!

By शुभांगी काळमेघ | Updated: July 10, 2025 17:08 IST

पावसाचा कहर: तलाव ओसंडत आले, नागपूर पुन्हा पुराच्या छायेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात सलग काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी आणि गोरेंवाडा तलावांची पातळी धोक्याच्या सीमेजवळ पोहोचली आहे. त्यामुळे २०२३ मधील अचानक आलेल्या महापुराची आठवण नागपूरकरांच्या मनात पुन्हा जागी झाली आहे. गेल्या २४ तासांत अंबाझरी तलावात १.८२ मीटरने पाण्याची पातळी वाढली असून, आता तो ओव्हरफ्लो होण्यासाठी फक्त २० सेंटीमीटर बाकी आहे. त्याचप्रमाणे गोरेंवाडा तलावाची पातळीही २.६८ मीटरवर पोहोचली असून, तीही ओव्हरफ्लोच्या अगदी जवळ आहे.

२०२३ च्या पुराच्या आठवणी ताज्या२३ सप्टेंबर २०२३ रोजी अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला होता आणि त्यात नागपुरात भीषण पूर आला होता. त्या पुरामध्ये चार नागरिकांनी जीव गमावला होता तर ३०० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले होते. तेव्हा पुरामुळे २५ पेक्षा अधिक वसाहती जलमय झाल्या होत्या. हजारो लोकांची घरे पाण्याखाली गेली होती. 

अपूर्ण ड्रेनेज, खोदकाम आणि ढिसाळ नियोजनावरून चिंताआता पुरामुळे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना जाहीर केल्या असल्या तरी अनेक कामे अद्यापही अपूर्ण आहेत. ड्रेनेज यंत्रणा कोलमडलेली आहे, रस्ते खोदकाम अजूनही अपूर्ण आहे, नाल्यांमध्ये गाळ आणि झाडे अडथळा बनत आहेत. काही ठिकाणी रिटेनिंग वॉल्सचे कामही सुरूच आहे, पण ते धीम्या गतीने चालू आहे. त्यामुळे पुराचा तडाखा सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. 

प्रशासन सज्ज पण नागपूरकर सतर्कनागपूर महापालिकेने अतिसंवेदनशील भागात बॅरिकेड्स आणि चेतावणी फलक लावले आहेत. तसेच एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. अंबाझरी धरणाजवळ रु. ४.४ कोटींच्या खर्चाने 'एस्केप गेट्स' बसवण्याचे काम सुरू आहे. सध्या ८ किमीपेक्षा अधिक लांबीचे रिटेनिंग वॉल्स बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

तलावांची पातळी वाढत आहे त्यामुळे प्रशासन यंत्रणा सज्ज असली तरी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर कामे अपूर्ण आहेत, नाले कचऱ्याने भरलेले आहेत त्यामुळे नागरिकांमध्येचिंता आणि भीतीदायक वातावरण आहे. नागपूरला २०२३ चा इतिहास पुन्हा अनुभवावा लागू नये, यासाठी वेळेवर आणि प्रभावी निर्णयांची गरज आहे.

टॅग्स :nagpurनागपूरAmbazari Lakeअंबाझरी तलावRainपाऊसfloodपूर