शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नागपुरात अक्कू यादव प्रकरणाची पुनरावृत्ती ; हत्येचा सूड,  आरोपीला ठेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 7:31 PM

Akku Yadav case repeated, crime news एका सरळसाध्या तरुणाची भोसकून हत्या करणाऱ्या गुंडाचा रात्रभर शोध घेत असलेल्या संतप्त जमावाने शनिवारी सकाळी तो दिसताच दगडाने ठेचून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले.

ठळक मुद्देअजनीत थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - एका सरळसाध्या तरुणाची भोसकून हत्या करणाऱ्या गुंडाचा रात्रभर शोध घेत असलेल्या संतप्त जमावाने शनिवारी सकाळी तो दिसताच दगडाने ठेचून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. तो मृत झाल्याचे समजून जमाव निघून गेला. मात्र, काही जणांनी रुग्णालयात नेल्यानंतर तो जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. शिवम ऊर्फ शक्तिमान शुद्धोदन गुरुदेव (वय १९) असे जखमी आरोपीचे नाव आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.

देशभर खळबळ उडवून देणाऱ्या अक्कू यादव प्रकरणाची आठवण ताजी करणारा हा थरारक प्रकार अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास घडला. स्वत:ला शक्तिमान म्हणवून घेणारा हा कुख्यात गुंड अजनीील काैशल्यानगरात राहतो. अल्पवयीन असताना पासूनच गुन्हेगारीत सक्रिय आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अवघ्या १९ वर्षाचा शक्तीमान स्वत:ला डॉन म्हणवून घेतो. त्याने आपली एक टोळी बनविली असून या टोळीतील गुन्हेगार, चोऱ्या, घरफोड्या, लुटमार आणि दारू विक्रीसारख्या अवैध धंद्यात गुंतले आहेत. आरोपीच्या घराजवळ, कल्पतरू बाैद्ध विहाराजवळ राहणारा स्वयंदीप ऊर्फ स्वयंम सत्यप्रकाश नगराळे (वय २१) आणि त्याचे काही मित्र आरोपींच्या अवैध दारू विक्रीच्या गुत्त्याला विरोध करीत होते. त्यातून त्यांच्यात वादही झाला होता. आपली परिसरात प्रचंड दहशत निर्माण व्हावी आणि कुणीही आपल्याविरुद्ध आवाज उठवू नये, यासाठी आरोपी शक्तीमान वेळोवेळी वादविवाद, मारहाण करायचा. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास स्वयंदीप जेवण करून बाहेर निघाला. आरोपी शक्तीमान, निशांत अरविंद घोडेस्वार (वय २२) आणि त्याचे साथीदार प्रकाश कावरेच्याघरासमोर ऑटोत बसून होते. त्यांनी स्वयंदीपला रोखले. शिवीगाळ करून त्याच्यावर चाकूचे सपासप घाव घालून त्याला ठार मारले. त्यानंतर आरडाओरड करीत पळून गेले. सरळमार्गी स्वयंदीपची आरोपींनी हत्या केल्याने या भागातील लोकभावना तीव्र झाल्या. पोलिसांसोबत संतप्त जमावही रात्रभर आरोपींचा शोध घेत होते. दुसरीकडे आपली दहशत निर्माण करण्यासाठी निर्ढावलेला शक्तीमान घराकडे परत आला. जमावाच्या नजरेस पडताच त्याच्याकडे काहींनी धाव घेतली. त्याला दगड विटांनी ठेचून रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. हा प्रकार कळताच अजनीचे पोलीस तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी आपापल्या ताफ्यासह काैशल्यानगरात पोहचले. दरम्यान, शक्तीमानला काही जणांनी उचलून मेडिकलमध्ये नेले. तो जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवले. त्याची प्रकृती गंभीर आहे.

परिसरात प्रचंड तणावस्वयंदीप नगराळेच्या हत्येपासून काैशल्यानगरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून तो आज दिवसभरही तसाच होता. परिसरातील नागरिक स्वयंदीपच्या हत्येमुळे शोक आणि संताप व्यक्त करीत होते. तर, या भागातील गुन्हेगारांवर अंकुश बसविण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही संताप व्यक्त करीत होते. आरोपी शक्तिमानला पोलिसांनी लगाम घातला असता तर ही घटना घडलीच नसती, असेही नागरिक बोलत होते. दरम्यान, लोकभावना लक्षात घेता परिस्थिती चिघळण्याचे संकेत मिळाल्यामुळे वरिष्ठांनी काैशल्यानगरात दंगा नियंत्रण पथकासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर