शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक गॅसवरील १८% जीएसटी हटवा ! 'ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन'ची केंद्र सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 15:52 IST

Nagpur : पेट्रोल आणि डिझेलवरील 'व्हॅट' (VAT) कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाचे 'ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन'तर्फे स्वागत करण्यात आले आहे.

नागपूर : पेट्रोल आणि डिझेलवरील 'व्हॅट' (VAT) कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाचे 'ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन'तर्फे स्वागत करण्यात आले आहे. मात्र, आता व्यावसायिक एलपीजीच्या (Commercial LPG) वाढत्या किमतींमुळे छोटे व्यापारी आणि रिक्षाचालक अडचणीत आले असून, त्यावरील १८% जीएसटी तातडीने कमी करावा, असे आवाहन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन सोळंके यांनी केले आहे.

​लहान व्यापाऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले

​नितिन सोळंके यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधताना सांगितले की, व्यावसायिक एलपीजीवर सध्या १८% जीएसटी लागू आहे. गॅसचे दर ५५-६० रुपयांवरून आता थेट ८०-८५ रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे छोटे हॉटेल व्यावसायिक, रेस्टॉरंट चालक आणि प्रामुख्याने ऑटो रिक्षा चालकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

​मध्यमवर्गीयांच्या खिशाला कात्री​व्यावसायिक गॅस महागल्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होत आहे. हॉटेलमधील खाद्यपदार्थ आणि परिवहन सेवा महागल्याने मध्यमवर्गीय आणि सामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. ज्याप्रमाणे इंधनाचे दर कपात करून जनतेला दिलासा देण्यात आला, त्याच धर्तीवर व्यावसायिक गॅसवरील जीएसटी दरातही तातडीने कपात करावी, अशी मागणी फाउंडेशनने केली आहे.

​"आजचा छोटा व्यापारी आणि आमचा रिक्षाचालक भाऊ हा 'रोज कमवतो आणि रोज खातो'. १८% जीएसटीचा हा प्रचंड बोजा त्यांच्या 'जीवनाचे चाक' थांबवत आहे. सरकारने गॅस स्वस्त केला, तरच या कष्टकऱ्यांच्या घरचा चुल्हा पेटत राहील आणि देशाची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने रुळावर येईल."- नितिन सोळंके, राष्ट्रीय अध्यक्ष, ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन.

English
हिंदी सारांश
Web Title : Remove 18% GST on commercial gas: Demand to Central Government.

Web Summary : Consumer organization demands GST reduction on commercial LPG, citing hardship for small businesses like restaurants and auto-rickshaw drivers. High gas prices impact food costs and transportation, burdening the middle class. The foundation urges immediate government action.
टॅग्स :nagpurनागपूरCylinderगॅस सिलेंडर