नागपुरात लॉकडाऊनमध्ये केवळ ५४ नव्या वाहनांचे रजिस्ट्रेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 02:01 IST2020-06-02T01:59:02+5:302020-06-02T02:01:52+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालयात (शहर) लॉकडाऊन च्या काळात १८ ते ३१ मेपर्यंत केवळ ५४ नव्या वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. सर्वसाधारणत: एक-दोन दिवसात एवढ्या वाहनांचे रजिस्ट्रेशन होत असते. १४ दिवसात झालेल्या या रजिस्ट्रेशनमुळे ५९ लाख ७६ हजार ७८२ रुपये राजस्व प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे सामान्यत: आरटीओला रोज २० लाख रुपयाचा राजस्व मिळत असतो.

नागपुरात लॉकडाऊनमध्ये केवळ ५४ नव्या वाहनांचे रजिस्ट्रेशन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयात (शहर) लॉकडाऊन च्या काळात १८ ते ३१ मेपर्यंत केवळ ५४ नव्या वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. सर्वसाधारणत: एक-दोन दिवसात एवढ्या वाहनांचे रजिस्ट्रेशन होत असते. १४ दिवसात झालेल्या या रजिस्ट्रेशनमुळे ५९ लाख ७६ हजार ७८२ रुपये राजस्व प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे सामान्यत: आरटीओला रोज २० लाख रुपयाचा राजस्व मिळत असतो.
आरटीओ (शहर) मध्ये वर्षभरात एकूण ७१०६ नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे. २०१९ मध्ये २६,०३६ वाहनांची नोंदणी झाली होती तर २०१८ मध्ये जवळपास ३० हजार वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. या वर्षी बीए-४ वाहनांच्या विक्रीवर बंदी आणि गुढीपाडवासारख्या सणांना वाहनांची विक्री झाली नाही. लॉकडाऊनच्या काळात १ एप्रिल ते १७ मे पर्यंत परमिट, टॅक्स, परवाने आदी कार्य बंद असल्याने आरटीओ कार्यालयाला कोणत्याच प्रकारचे राजस्व प्राप्त झाले नाही आणि आताही तशीच स्थिती आहे. केवळ १० टक्के कर्मचाऱ्यांना ठेवून कामकाज सुरू आहे.
आरटीओ (ग्रामीण) कार्यालयात मात्र शहर कार्यालयापेक्षा जास्त वाहनांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत या वर्षी ग्रामीण मध्ये १४,०७४ वाहनांची नोंद झाली आहे. २०१९ मध्ये ४९,१५५ नव्या वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. आरटीओ, पूर्व मध्ये २०२० च्या आर्थिक वर्षात १६,७८६ आणि २०१९ मध्ये ५८७,९४० वाहनांची नोंदणी करण्यात आली होती.