मेट्रोच्या कामावर स्थगिती देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 00:58 IST2018-03-21T00:58:28+5:302018-03-21T00:58:42+5:30

वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने मंगळवारी मेट्रो रेल्वेचे खवा मार्केटमधील दुर्गा माता मंदिर परिसरातील काम थांबविण्यास नकार दिला. तसेच, दुर्गा माता मंदिर ट्रस्टचा यासंदर्भातील अर्ज खारीज केला.

Refuse to stay on the Metro work | मेट्रोच्या कामावर स्थगिती देण्यास नकार

मेट्रोच्या कामावर स्थगिती देण्यास नकार

ठळक मुद्देदिवाणी न्यायालय : दुर्गा माता मंदिर ट्रस्टचा अर्ज खारीज

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने मंगळवारी मेट्रो रेल्वेचे खवा मार्केटमधील दुर्गा माता मंदिर परिसरातील काम थांबविण्यास नकार दिला. तसेच, दुर्गा माता मंदिर ट्रस्टचा यासंदर्भातील अर्ज खारीज केला.
दुर्गा माता मंदिर असलेल्या जागेतून मेट्रो रेल्वेचे काम केले जात आहे. या जमिनीच्या मालकी हक्काबाबत वाद आहे. मंदिर ट्रस्ट व महापालिका हे दोघेही जमिनीवर मालकी हक्क सांगत आहेत. जमिनीची मालकी मिळावी यासाठी दुर्गा माता मंदिर ट्रस्टने पॉवर आॅफ अ‍ॅटर्नी उर्मिला विश्वकर्मा यांच्यामार्फत दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. ट्रस्टने या दाव्यात स्वतंत्र अर्ज दाखल करून दावा प्रलंबित असेपर्यंत मेट्रोच्या कामावर स्थगिती देण्याची विनंती केली होती. मेट्रो रेल्वेने त्याला विरोध केला. विश्वकर्मा यांना असा अर्ज दाखल करण्याचा अधिकार नाही. तसेच, कायद्यानुसार दिवाणी न्यायालयात हे प्रकरण चालू शकत नाही असे आक्षेप मेट्रो रेल्वेने घेतले. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता मेट्रोच्या कामावर स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच, मूळ दाव्यावर १३ एप्रिल रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे. मेट्रो रेल्वेतर्फे अ‍ॅड. विराट मिश्रा, अ‍ॅड. सचिन अग्रवाल व अ‍ॅड. कौस्तुभ देवगडे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Refuse to stay on the Metro work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.