मास्कच्या वापराने व्हायरलचे रुग्ण कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:24 IST2020-12-04T04:24:31+5:302020-12-04T04:24:31+5:30
नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्कच्या वापराची सवय गरजेची झाली आहे. या सवयीमुळे कोरोनाच नव्हे तर विषाणूजन्य आजारांनाही दूर ठेवणे ...

मास्कच्या वापराने व्हायरलचे रुग्ण कमी
नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्कच्या वापराची सवय गरजेची झाली आहे. या सवयीमुळे कोरोनाच नव्हे तर विषाणूजन्य आजारांनाही दूर ठेवणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, बदलत्या वातावरणामुळे व्हायरलच्या रुग्णांत दरवर्षी मोठी वाढ होते, परंतु मास्कचा उपयोग वाढल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी विषाणूजन्य आजारांचे रुग्ण कमी झाले आहेत. मास्कचा वापर व सुरक्षित अंतराचे आपण नेहमी पालन केल्यास क्षयरोगाच्या नव्या रुग्णांतही घट येऊ शकते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढताच मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग व वारंवार हात धुणे या त्रिसूत्रींचे आवाहन केले जात आहे. आता तर हा एक जीवनशैलीचा भाग झाला आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरण्यास प्राधान्य दिले जात आहे. याचा फायदा कोरोनासोबतच इतर विषाणूजन्य आजारांना दूर ठेवण्यास मदत होत आहे. परंतु दरम्यानच्या काळात कोरोनाचे रुग्ण कमी होताच मास्कचा वापर कमी झाल्याचे दिसून आले. परिणामी, महानगरपालिका व पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. दंडाची रक्कम वाढवून ५०० रुपये केली. यामुळे कारवाईच्या भितीने का होईना, मास्कचा वापर पुन्हा वाढला आहे. कोरोनासोबतच इतर विषाणूजन्य आजारांना दूर ठेवण्यास त्याचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
अॅलर्जी सारख्या रुग्णांची संख्याही कमी
पावसाळ्यात व हिवाळ्यात सर्वाधिक रुग्ण अॅलर्जीचे दिसून यायचे. सर्दी, खोकल्याने नागपुरकर हैराण व्हायचे. परंतु शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये आता या आजाराचे फार कमी रुग्ण दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरवर्षी दिसणाºया संसर्गजन्य आजार स्वाईन फ्लूचे रुग्ण नसल्यासारखेच आहेत.
-श्वसनाच्या आजारांच्या रुग्णांतही घट
या दिवसांत धुर व धुळीमुळे वाढणाºया अस्थमाचे रुग्ण कमी झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. श्वसनाचा आजार असलेल्यांसाठी मास्क वापरण्याचे आवाहन पूर्वीपासून केले जात होत होते. परंतु आता त्याचा उपयोग करणाºयांची संख्या वाढल्याने याचा फायदा रुग्णांना होता दिसून येत आहे.
-ओपीडीत मोठी घट
मेडिकल व मेयोमध्ये हिवाळाच्या दिवसांत २५०० ते ३००० वर ओपीडी असायची. यात बहुसंख्य रुग्ण हे व्हायरल व श्वसनाशी संबंधित आजाराचे असायचे. परंतु आता १००० ते १५००वर ओपीडी आली आहे. सध्या लॉकडाऊनच्या दरम्यान अंगावर आजार काढलेले रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
विषाणूजन्य आजारांना दूर ठेवण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे ही त्रिसूची महत्त्वाची ठरते. कोरोनाचा दहशतीमुळे का होईना याचा वापर वाढला आहे. परिणामी, सर्दी, खोकला, व्हायरलचे रुग्ण कमी दिसून येत आहे.
-डॉ. प्रशांत पाटील, प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग, मेडिकल
मागीलवर्षी ओपीडी-२५००
या वर्षीची ओपीडी १५००
(मागील वर्षी आणि या वर्षी हिवाळ्यातील मेडिकलमधील एका दिवसाची आकडेवारी)