शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
4
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
5
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
6
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
7
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
8
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
9
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
10
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
11
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
12
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
13
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
14
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
15
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
16
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
17
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
18
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
19
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
20
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
Daily Top 2Weekly Top 5

विजेचे दर निम्मे करा, शेतीपंपाचे लोडशेडिंग संपवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 22:28 IST

भरमसाट वाढलेले विजेचे दर निम्मे करण्यात यावे, शेतीपंपाचे लोडशेडिंग बंद व्हावे, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने सोमवारी जुना काटोल नाका चौक येथील महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समिती : प्रस्तावित वीज दरवाढीचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरमसाट वाढलेले विजेचे दर निम्मे करण्यात यावे, शेतीपंपाचे लोडशेडिंग बंद व्हावे, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने सोमवारी जुना काटोल नाका चौक येथील महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी प्रस्तावित वीज दरवाढीचा निषेध करण्यात आला.शेतीपंपाला वीजबिलातून मुक्त करण्यात यावे, स्थिर आकार, वीज वहन कर आदी बंद करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या मागण्या मान्य न झाल्यास वीज बिल भरू नका, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. देशात सर्वाधिक महाग वीज महराष्ट्रातच आहे. दिल्लीमध्ये २०० युनिटपर्यंत वीज बिल नाही. हरियाणा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आदी राज्यांत विजेचे दर कमी आहेत. तेव्हा महाराष्ट्र आणि विदर्भालाच वीज महाग का? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. सातत्याने वीज दरवाढ केली जाते. हा भ्रष्टाचार आहे. महावितरण ५३ हजार कोटी रुपयाच्या तोट्यात असल्याचे सांगितले जाते. याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली. मागणी निवेदन मुख्य अभियंत्यांना सादर करण्यात आले.या धरणे आंदोलनात समितीचे प्रमुख अ‍ॅड. वामनराव चटप, मुख्य संयोजक राम नेवले, रंजना मामर्डे, डॉ. श्रीनिवस खांदेवाले, मुकेश मासूरकर, अरुण केदार, राजेंद्र आगरकर, सुनील वडस्कर, गुलाबराव धांडे, वृषभ वानखेडे, नीळकंठराव घवघवे, विठ्ठलराव काकडे, श्रीराम अंबाडकर, विजया धोटे, प्रवीण राऊत, पुरुषोत्तम हगवणे, प्यारुभाई नौशाद आली, अरविंद बोरकर, बाबुराव गेडाम, विष्णुजी आष्टीकर, रामेश्वर मोहबे, जगदीश मोकुलवार, बाबा राठोड, अरुण खंगार, भाग्यश्री मते, कल्पना मते, अण्णाजी राजेधर, रामदास राऊत, शाहीर कोठेकर, वसंतराव वैद्य, अरविंद भोसले, विजय मौंदेकर, पांडुरंग बिजवे, रजनी शुक्ला, सोनम कुमरे, तेजस चोरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीजbillबिलagitationआंदोलन