शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

सरकारविरोधात असंतोषाचा लाल सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:28 IST

भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आला. भाजपा सरकार कॉर्पोरेट व भांडवलदारांच्या हितासाठीच कार्यरत असल्याचा आरोप आणि सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी देत मोर्चाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे कूच केली.

ठळक मुद्देभाकपातर्फे विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आला. भाजपा सरकार कॉर्पोरेट व भांडवलदारांच्या हितासाठीच कार्यरत असल्याचा आरोप आणि सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी देत मोर्चाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे कूच केली.भाकपाचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे यांच्या नेतृत्वात नेहरू बालोद्यान, सुभाष रोड येथून हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने आंदोलनकारी सहभागी झाले. शेतकरी, शेतमजूर, अंगणवाडी कर्मचारी, पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, असंघटित कामगार,जबरान जोत आदिवासी, महिला, युवक, विद्यार्थी यांच्या ज्वलंत मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. संविधान चौकात सभा घेण्यात आली. यामध्ये कॉ. भस्मे यांनी सरकारला धारेवर धरले. गेल्या ७० वर्षांत देशातील ४८ टक्के संपत्ती १ टक्का लोकांच्या हातात होती. मात्र भाजपा सरकारच्या चार वर्षाच्या काळात यामध्ये प्रचंड वाढ झाली असून, आता देशाची ७३ टक्के संपत्ती एक टक्का लोकांच्या हातात गेल्याचा आरोप त्यांनी केला. या काळात शिक्षणाचे व्यापारीकरण झाले, बेरोजगारीत प्रचंड वाढ झाली, दलित, अल्पसंख्यांकावर हल्ले वाढले आणि पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याची टीका त्यांनी केली.शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, बोंडअळी व दुष्काळग्रस्त शेतक ऱ्याना तत्काळ मदत, शेतमालाला दीडपट भाव मिळावा, जबरान जोतधारकांना वनजमिनीचे हक्क देण्यात यावे, अंगणवाडी, पोषण आहार व ग्रामपंचायत कर्मचा  ऱ्या च्या मानधनात वाढ व्हावी,झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे, बेरोजगारांना काम अशा विविध मागण्या करण्यात आल्या. त्यानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सोपविले. आंदोलनात कॉ. श्याम काळे, कॉ. अरुण वनकर, डॉ. महेश कोपुलवार, हिरालाल येरमे, प्रकाश खोब्रागडे, चंद्रभान मेश्राम, संजय वाकडे, होसलाल रहांगडाले, नामदेव कन्नाके, संतोष दास, प्रकाश रेड्डी, सदानंद इलमे, हिवराज उके, माधवराव बांते, असलम पठाण, सुधाकर वाघुके आदींचा सहभाग होता.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर