शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

अतिरिक्त न्यायमूर्तींना कायम करण्याची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:06 AM

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयातील १४ अतिरिक्त न्यायमूर्तींना सेवेत कायम करण्याची शिफारस केली आहे. त्यात विदर्भातील पाच न्यायमूर्तींचा समावेश आहे.

ठळक मुद्देकॉलेजियमचा निर्णय : विदर्भातील पाच न्यायमूर्तींचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयातील १४ अतिरिक्त न्यायमूर्तींना सेवेत कायम करण्याची शिफारस केली आहे. त्यात विदर्भातील पाच न्यायमूर्तींचा समावेश आहे.१४ अतिरिक्त न्यायमूर्तींमध्ये संदीप शिंदे, रोहित देव, भारती डांगरे, सारंग कोतवाल, रियाझ छागला, मनीष पितळे, एस. के. कोतवाल, अरुण उपाध्ये, मंगेश पाटील, ए. एम. ढवळे, पृथ्वीराज चव्हाण, मुरलीधर गिरटकर, व्ही. व्ही. कांकणवादी व एस. एम. गव्हाणे यांचा समावेश आहे. यापैकी रोहित देव, भारती डांगरे, मनीष पितळे, पृथ्वीराज चव्हाण (सर्व नागपूर) व मुरलीधर गिरटकर (चंद्रपूर) हे वैदर्भीय आहेत. या सर्वांची ५ जून २०१७ रोजी अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. आतापर्यंतची कामगिरी लक्षात घेता सर्व जण न्यायमूर्तीपदी कायम होण्यास पात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे व न्या. एन. व्ही. रामणा यांच्या कॉलेजियमने निर्णयात स्पष्ट केले आहे. राष्ट्रपतींनी ही शिफारस मंजूर केल्यानंतर सर्व जण न्यायमूर्तीपदी कायम होतील. त्यासंदर्भात अधिसूचना जारी केली जाईल. 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर