शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

योजनेतील साहित्याऐवजी अंगणवाड्यात, आधिच उपलब्ध साहित्यांचा पुन्हा पुरवठा

By गणेश हुड | Updated: April 29, 2024 16:01 IST

Nagpur : योजना चौकशीच्या फेऱ्यात; बहुसंख्य अंणवाड्यात आधिच उपलब्ध साहित्याची खरेदी दर्शविण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील अंगणवाड्यांना अंगणवाडी श्रेणिवर्धन योजनेतून साहित्याचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदाराची धावाधाव सुरु आहे. परंतु पुरवठा होत असलेल्या साहित्यात योजनेतील साहित्य पुरविता आधिच उपलब्ध साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. परिणामी  आता ही संपूर्ण योजनाच चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे.

अंगणवाडी श्रेणिवर्धन योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये साहित्याचा पुरवठा करण्यासोबत डागडुजी, बांधकाम, सौरप्रकल्प, दरवाजे, खिडकी आदींसोबतच पिण्याच्या पाण्याची सोय, बेबी फ्रेण्डली शौचालय,  सुरक्षाभिंत आदी कामे प्राधान्याने  करण्याचे निर्देश महिला व बालविकास आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आले होते. या कामासाठी दोन टप्प्यांत एक कोटी सहा लाखांचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला. जिल्हा हा सर्व निधी पंचायत समितीस्तरावरील  चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर  (सीडीपीओ) यांच्या खात्यात वळता करण्यात आला.योजना चौकशीच्या फेऱ्यातसीडीपीओंनी शासनाच्या प्राधान्यक्रमानुसार  ४९ अंगणवाड्यांसाठी साहित्य खरेदी करण्यात आलेले नाही. बहुसंख्य अंणवाड्यात आधिच उपलब्ध टीव्ही, ऑफिस अलमारी, पाणी शुद्धीकरणाचे इलेक्ट्रिक यंत्र, १०० किलो धान्यक्षमतेची कोठी, हात धुण्याचे यंत्र, ग्रीन मॅट व डिजिटल मल्टिकलर प्रिंटर आदी साहित्याची खरेदी दर्शविण्यात आली आहे. तसेच या साहित्याबाबत कुठलेही स्पेसिफिकेशन निश्चित करण्यात आले नाही. टीव्ही किती इंची असावी, धान्यकोटी लोखंडी, स्टील किंवा सिंथेटिक असावी, प्रिंटर आदींबाबत काहीच निश्चित करण्यात आले नाही. शासकीय मानके डावलून हा सर्व प्रकार झाल्याची माहिती पुढे येत आहे.

 

टॅग्स :anganewadi jatraआंगणेवाडीSchoolशाळाCorruptionभ्रष्टाचारnagpurनागपूर