वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी १० फेब्रुवारीला रास्ता रोको, जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 08:56 PM2019-12-24T20:56:49+5:302019-12-24T20:57:53+5:30

वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीच्या मागणीसाठी १० फेब्रुवारीला विदर्भभर रस्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्याचा आणि २५ फेब्रुवारीला नागपूरमध्ये रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा विदर्र्भ राज्य आंदोलन समितीने दिला आहे.

Rasta Roko on February 10 to demand a separate Vidarbha | वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी १० फेब्रुवारीला रास्ता रोको, जेलभरो

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी १० फेब्रुवारीला रास्ता रोको, जेलभरो

Next
ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समिती : आत्मक्लेष आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीच्या मागणीसाठी १० फेब्रुवारीला विदर्भभर रस्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्याचा आणि २५ फेब्रुवारीला नागपूरमध्ये रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा विदर्र्भ राज्य आंदोलन समितीने दिला आहे. तसेच १ मेला महाराष्ट्र दिनी विदर्भ बंद करून सरकारचा निषेध व्यक्त करण्याचेही आवाहन समितीने केले आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी व विदर्भातील विजेचे दर निम्मे करण्यासाठी मंगळवारी २४ डिसेंबरला विदर्भभर जिल्हा व तालुका स्तरावर एक दिवसीय उपोषण (आत्मक्लेष आंदोलन) करण्यात आले. नागपुरात झालेल्या आंदोलनादरम्यान ही घोषणा करण्यात आली.
विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये १२० ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ पासून तर ५ पर्यंत आंदोलकांनी ठिय्या देऊन घोषणाबाजी केली. नागपूर शहरातील आंदोलन विदर्भ चंडिका मंदीरासमोर शहीद चौकात करण्यात आले. यात मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्य संयोजक राम नेवले यांनी काँग्रेस सरकारनेही विदर्भाच्या जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. भाजपाने विदर्भ राज्य देण्याचे कबूल करूनही दिले नाही. शिवसेनेच्या धाकामुळे ते पाच वर्ष विदर्भाबाबत बोलले नाही. विदर्भाला धोका दिल्याने विदभार्तून १५ आमदारासह त्यांचा जनाधार कमी झाला. परिणामी महाराष्ट्रातून सत्ता गेली, याची त्यांनी जाणीव ठेवावी. विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.
डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला आता विदर्भ निर्माण करावाच लागेल. शिवसेना व भाजपाची सत्तेची दोस्ती संपल्याने शिवसेनेचा विरोध असल्याचे कारण आता राहिलेले नाही. त्यामुळे विदर्भ निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी नागपूर विभाग युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासूरकर, गणेश शर्मा, मंगलमूर्ती सोनकुसळे, अ‍ॅड. नीरज खांदेवाले, गुलाबराव धांडे, बाबा तारेकर, अन्नाजी राजेधर, भिमराव फूसे, विजया धोटे, रेखा निमजे, रजनी शुक्ला, ज्योती खांडेकर यांचीही भाषणे झाली. उपोषणात विजय मौदेकर, विष्णू आष्टीकर, बाबा राठोड, रामभाऊ कावडकर, अनिल केशरवाणी, शेखर काकडे, रामेश्वर मोहबे, कर्नल कैलास चरडे, संजय धापोडकर, जगदीश खापेकर, अजय माने, शोभा डोंगरे, सुवासिनी खडसे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Rasta Roko on February 10 to demand a separate Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.