राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्षपदी डॉ. शरद निंबाळकर यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 22:38 IST2019-11-30T22:37:43+5:302019-11-30T22:38:04+5:30
22 डिसेंबरला तुमसर (जिल्हा भंडारा) तालुक्यातील राजापूर या गावांमध्ये हे संमेलन होणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्षपदी डॉ. शरद निंबाळकर यांची निवड
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक, कृषी तज्ञ तथा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. 22 डिसेंबरला तुमसर (जिल्हा भंडारा) तालुक्यातील राजापूर या गावांमध्ये हे संमेलन होणार आहे.