नागपुरात  नंदनवनमध्ये युवतीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:15 IST2019-02-16T00:14:39+5:302019-02-16T00:15:32+5:30

नंदनवनमध्ये घराशेजारच्या तरुणाने एका युवतीला (वय १७) आपल्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीची आई तिला शोधत आरोपी रजत मनोहर मेश्राम (वय २३) याच्या घरी गेल्यानंतर तिला नको तो प्रकार दिसला. त्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात गेले.

Rape of a young woman in Nagpur | नागपुरात  नंदनवनमध्ये युवतीवर बलात्कार

नागपुरात  नंदनवनमध्ये युवतीवर बलात्कार

ठळक मुद्देशेजारच्या तरुणाचे कुकृत्य : आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नंदनवनमध्ये घराशेजारच्या तरुणाने एका युवतीला (वय १७) आपल्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीची आई तिला शोधत आरोपी रजत मनोहर मेश्राम (वय २३) याच्या घरी गेल्यानंतर तिला नको तो प्रकार दिसला. त्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात गेले.
पोलिसांच्या माहितीनुसार, नंदनवनमधील १७ वर्षीय मुलगी तिच्या घरी गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास एकटी होती. शेजारी राहणारा आरोपी रजत तिच्या घरी आला. त्याने युवतीला आपल्या घरात नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, मुलीची आई घरी आली आणि घरात मुलगी नसल्याचे पाहून तिला शोधण्यासाठी ती रजतच्या घरी गेली असता हे दोघे नको त्या अवस्थेत दिसले. यावेळी मुलीने रजतने आपल्यावर जबरदस्ती केल्याचे आईला सांगितले. त्यानंतर नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून बलात्काराच्या आरोपाखाली रजतला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
महिलेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी
सीताबर्डीत दुकान चालविणाऱ्या एका ३५ वर्षीय पीडितेचा विनयभंग करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या  राजेश गोपाळराव इंगळे (वय ४५, रा. फ्रेण्डस कॉलनी, वेणीवन सोसायटी) याला पोलिसांनी अटक केली.
पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी इंगळेचे तिच्या बाजूलाच सीताबर्डीत दुकान आहे. त्यामुळे या दोघांमध्ये ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याने तिच्याशी सलगी साधण्याचे आटोकाट प्रयत्न चालविले आहेत. तिच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने गुरुवारी भलताच पवित्रा घेतला. १४ फेब्रुवारीला दुपारी १.३० वाजता तो तिच्या दुकानात शिरला. ती एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. तिने विरोध केला असता आरोपीने तिला शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी दिली. तिने आरडाओरड केल्याने बाजूची मंडळी धावली. त्यानंतर आरोपी निघून गेला. त्याच्याकडून धोका होऊ शकतो, हे ध्यानात घेऊन पीडितेने सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपी राजेशला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Rape of a young woman in Nagpur