नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 00:52 IST2019-10-02T00:52:16+5:302019-10-02T00:52:56+5:30

वर्षभरापासून शरीरसंबंध जोडणाऱ्या प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे प्रेयसीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला.

Rape in Nagpur showing marriage bait | नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

ठळक मुद्देवर्षभरापासून अनेकदा शरीरसंबंध : जरीपटक्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्षभरापासून शरीरसंबंध जोडणाऱ्या प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे प्रेयसीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला. प्रियकराच्या आईवडिलांनीही यापूर्वी लग्नास होकार देऊन आता नकार दिल्याने त्यांचेही नाव तक्रारकर्त्या तरुणीने जरीपटका पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नोंदवले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले.
तक्रार करणारी तरुणी २७ वर्षांची आहे. ती जरीपटक्यात राहते. आरोपी कुणाल किशोर सावरकर हा पॉवर ग्रीड चौकाजवळ राहतो. तो आणि तरुणी एका रिक्रूटमेंट कंपनीत काम करायचे. त्यामुळे कुणालसोबत तिचा संपर्क होता. तो मैत्रीत आणि नंतर प्रेमात रूपांतरित झाला. तिच्या तक्रारीनुसार, कुणालने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत १ सप्टेंबर २०१८ पासून शरीरसंबंध जोडणे सुरू केले. वर्षभरात त्यांनी अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केले. दरम्यान, त्यांच्या संबंधाचा बोभाटा झाल्यामुळे दोन्हीकडे माहिती गेली. लग्नासाठी तरुणी आक्रमक झाल्याचे पाहून मध्यंतरी कुणालचे वडील किशोर सावरकर आणि आई मीना किशोर सावरकर यांनी तुमचे लग्न लावून देतो, असे सांगितले. कुणालच्या आईवडिलांकडून आश्वासन मिळाल्याने ती आश्वस्त झाली. मात्र, अलीकडे लग्नाचा विषय काढताच कुणाल तिला टाळू लागला. तो दुसरीकडे गुंतल्याचा संशय आल्याने ती पुन्हा आक्रमक झाली. यावेळी त्याने लग्नास चक्क नकार दिला. त्याच्या आईवडिलांनीही कानावर हात ठेवले. त्यामुळे तरुणीने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. जरीपटक्याचे ठाणेदार पराग पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नेरकर यांनी सोमवारी कुणाल तसेच त्याच्या आईवडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
प्रकरणाला दुसरी बाजू ?
या प्रकरणाला दुसरी बाजू असल्याची चर्चा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रकरण तांत्रिक स्वरूपाचे (प्रेमप्रकरण आणि शरीरसंबंध) असल्याने आरोपींना अटक करण्याची गडबड करण्याऐवजी सर्व बाजूने प्रकरणाचा तपास केला जात असल्याचे जरीपटका पोलीस सांगत आहेत.

Web Title: Rape in Nagpur showing marriage bait