नागपुरात वस्तीतील युवकाचा युवतीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:26 IST2018-03-30T01:26:46+5:302018-03-30T01:26:58+5:30

वस्तीतील युवतीच्या घरात शिरून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जय शीतलप्रसाद शाहू (वय २२, रा. तकीया धंतोली) असे आरोपीचे नाव आहे. तो तकीया धंतोलीत राहतो. त्याच्या वडिलांचे किराणा दुकान आहे.

Rape of girl in Nagpur | नागपुरात वस्तीतील युवकाचा युवतीवर बलात्कार

नागपुरात वस्तीतील युवकाचा युवतीवर बलात्कार

ठळक मुद्देधंतोली ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : वस्तीतील युवतीच्या घरात शिरून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जय शीतलप्रसाद शाहू (वय २२, रा. तकीया धंतोली) असे आरोपीचे नाव आहे. तो तकीया धंतोलीत राहतो. त्याच्या वडिलांचे किराणा दुकान आहे.
पीडित १७ वर्षीय युवती दहावीची विद्यार्थीनी असून, आधी त्याच्या घरीच किरायाने राहायची. आता ती याच भागात वेगळ्या ठिकाणी राहते. बुधवारी दुपारी ११.४५ वाजता ती घरात एकटी असल्याचे पाहून तो तिच्या घरात शिरला. त्याने तिच्या घराचे दार बंद करून तिच्यावर अत्याचार केला. तिने विरोध केला असता, आरोपी शाहूने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. बलात्कारानंतर आरोपी पळून गेला. मुलीने आपल्या पालकांना ही माहिती दिली. त्यानंतर धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्कार तसेच मारहाण करून धमकी दिल्याच्या आरोपावरून कलम ४५२, ३७६, ५०६ (ब) तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Rape of girl in Nagpur