Rape by Facebook friend in Nagpur | नागपुरात  फेसबूक फ्रेण्डचा बलात्कार

नागपुरात  फेसबूक फ्रेण्डचा बलात्कार

ठळक मुद्देमुलीने केली तक्रार - एमआयडीसीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एमआयडीसीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्या फेसबुक फ्रेण्डने वर्षभरात अनेकदा बलात्कार केला. बादल प्रमोद गोस्वामी (वय २१) असे आरोपीचे नाव असून एमआयडीसी पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार सोमवारी गुन्हा दाखल केला.

तक्रार करणारी मुलगी १६ वर्षांची आहे. २० डिसेंबर २०१९ ला आरोपी बादलसोबत तिची फेसबुकवर मैत्री झाली. ऑनलाईन चॅटिंगनंतर या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. मुलीच्या बाजूलाच आरोपीचे कबाडीचे दुकान असल्याने संधी मिळेल तेव्हा ते शरीरसंबंध प्रस्थापित करू लागले. या दोघांच्या संबंधाचा रविवारी दुपारी भंडाफोड झाल्यानंतर मुलीच्या पालकांनी जाब विचारला. त्यानंतर प्रकरण एमआयडीसी पोलिसांकडे पोहचले. रविवारी या प्रकरणात सविस्तर बयाण नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी सोमवारी आरोपी बादलविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपी बादलला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Rape by Facebook friend in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.