नागपुरात तरुणीची हॉटेल व्यवस्थापकाविरुद्ध बलात्काराची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 20:01 IST2019-10-10T19:59:16+5:302019-10-10T20:01:46+5:30
मेक अप आर्टिस्टला लग्नाचे आमिष दाखवून हॉटेल व्यवस्थापकाने तिच्याशी दीड वर्षांत अनेकदा शरीरसंबंध जोडले. यादरम्यान तिच्याकडून १ लाख २५ हजार रुपयेही घेतले. आता मात्र लग्नास नकार देऊन आरोपी पळून गेला.

नागपुरात तरुणीची हॉटेल व्यवस्थापकाविरुद्ध बलात्काराची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेक अप आर्टिस्टला लग्नाचे आमिष दाखवून हॉटेल व्यवस्थापकाने तिच्याशी दीड वर्षांत अनेकदा शरीरसंबंध जोडले. यादरम्यान तिच्याकडून १ लाख २५ हजार रुपयेही घेतले. आता मात्र लग्नास नकार देऊन आरोपी पळून गेला. त्याची दगाबाजी लक्षात आल्याने तरुणीने (वय २१) त्याच्याविरुद्ध बलात्कार तसेच फसवणुकीचा आरोप लावला. अजहर अली अरमान अली (वय २४) असे आरोपीचे नाव आहे. तो जाफरनगरात राहतो.
तक्रारदार तरुणी मेकअप आर्टिस्ट आहे. आरोपी अजहर सदरमधील हॉटेल गॅलेक्सीमध्ये व्यवस्थापक होता. तेथे तरुणी जेवणाचे ऑर्डर नोंदवण्यासाठी येत होती. नेहमीचे येणे-जाणे असल्यामुळे वर्षभरापूर्वी त्यांच्यात मैत्री झाली. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपी अजहरने तिच्यासोबत लग्न करण्याची तयारी दाखवून २५ डिसेंबर २०१८ पासून शरीरसंबंध जोडणे सुरू केले. दरम्यान, वेगवेगळे कारण सांगून त्याने तिच्याकडून १ लाख २५ हजार रुपये घेतले. सप्टेंबर २०१९ पासून तो तिला टाळू लागला. त्यामुळे तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव वाढवला. त्याने लग्नास स्पष्ट नकार देऊन पळ काढला. तिने त्याच्यासोबत संपर्क केला असता, त्याने तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे तरुणीने आरोपी अजहरविरुद्ध बलात्कार करून फसवणूक केल्याची तक्रार नोंदवली. सदर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अजहरविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.