धुळीमुळे रामटेककरांचा काेडताेय श्वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:22 IST2020-12-04T04:22:43+5:302020-12-04T04:22:43+5:30

राहुल पेटकर। लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : रामटेकच्या निसर्गरम्य वातावरणात सध्या प्रदूषणात वाढ झाली आहे. मनसर-रामटेक-तुमसर मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम ...

Ramtekkar's shortness of breath due to dust! | धुळीमुळे रामटेककरांचा काेडताेय श्वास!

धुळीमुळे रामटेककरांचा काेडताेय श्वास!

राहुल पेटकर। लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : रामटेकच्या निसर्गरम्य वातावरणात सध्या प्रदूषणात वाढ झाली आहे. मनसर-रामटेक-तुमसर मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. धुळीमुळे वाहनचालकांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रामटेक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. रामटेकलगत सातपुडा पर्वतरांगा आहेत. रामटेकचा परिसर हा झाडा-फुलांनी नटलेला आहे. हिरवेगार रामटेक बघितल्यावर येथे प्रदूषणाचा लवलेशही नाही, असेच सर्वांना वाटत असेल मात्र सध्या तसे नाही.

मनसर-तुमसर रस्त्याचे बांधकाम गेल्या दाेन वर्षांपासून सुरू आहे. हे काम बारब्रिक कंपनी करीत आहे. आतापर्यंत काम शहराबाहेर हाेते. परंतु सध्या रामटेक शहरालगत हे काम सुरू आहे. एका बाजूने काम व दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू आहे. वाहतुकीसाठी मातीचा रस्ता बनविला जाताे. येथे डांबरीकरण करणे बंधनकारक असते. मात्र त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. परिणामी मार्गाने वाहतूक सुरू असताना माेठ्या प्रमाणात धुळ उडताे.

बसस्थानक, शीतलवाडी, खैरी बिजेवाडा, मनसर व रामटेक परिसरात मार्गालगत लाेकवस्ती आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरात धूळ पसरते. इतकेच नव्हे तर नाकाताेंडात धूळ जात असल्याने अनेकांना श्वसनाचे आजार उद्भवत आहेत. तसेच या परिसरात काही ठिकाणी शेती असून, तेथील पिकांवर धूळ साचताे.

बारब्रिक कंपनी टॅंकरद्वारे रस्त्यावर पाणी टाकते. मात्र ते काही ठिकाणी पडत असते. आजूबाजूने वाहतूक सुरू असल्याने मार्गावर माेठ्या प्रमाणावर धुळ पसरताे. यामुळे वाहनचालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागताे.

....

प्रदूषणाचा स्तर उंचावला

रामटेकमध्ये प्रदूषणाचा स्तर फार कमी असताे. नागपूरपेक्षा येथे हवा शुद्ध मानली जाते. परंतु सध्या मार्गाच्या बांधकामानुसार प्रदूषणाचा स्तर उंचावला आहे. धुळीमुळे श्वसनाचे आजार हाेतात. श्वास घ्यायला त्रास हाेताे. घशात धूळ साचून आराेग्य समस्या निर्माण हाेत असल्याचे जाणकार सांगतात.

....

पिकांवर विपरीत परिणाम

मार्गालगत असलेल्या शेतातील पिकांवर माेठ्या प्रमाणावर धूळ साचल्याने त्याचा विपरीत परिणाम हाेत आहे. पिकांची वाढ खुंटली आहे. सध्या काेराेना संसर्गामुळे ताेंडावर मास्क वापरणे आवश्यक आहे. काही प्रवासी मास्कमुळे धुळीपासून बचाव करतात. परंतु पिकांचे नुकसान हाेत आहे. धुळीची समस्या लक्षात घेता निर्माणाधीन रस्त्यावर सतत पाणी टाकणे गरजेचे आहे. जेणेकरून धूळ उडणार नाही, याबाबत कंत्राटदार कंपनीने खबरदारी घ्यावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

Web Title: Ramtekkar's shortness of breath due to dust!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.