शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

नागपुरात सिरियल किलरचा आठ वर्षांपासून हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:52 PM

लकडगंज पोलिसांनी हत्या प्रकरणात पकडलेला विकृत सिरियल किलर छल्ला ऊर्फ दुर्गेश ध्रुपसिंग चौधरी (वय २८, रा. रेणुकानगर, गंगाबाग, पारडी) हा नागपूरसह विविध गावांमध्ये गेल्या आठ वर्षांपासून अक्षरश: हैदोस घालत होता, अशी थरारक माहिती उघड झाली आहे.

ठळक मुद्देचार हत्या, अनेकांच्या हत्येचे प्रयत्न चोऱ्या  - घरफोड्या : ३० पेक्षा जास्त गुन्हे अनेक गुन्हे दाखलच नाहीत

नरेश डोंगरेआॅनलाईन लोकमतनागपूर : लकडगंज पोलिसांनी हत्या प्रकरणात पकडलेला विकृत सिरियल किलर छल्ला ऊर्फ दुर्गेश ध्रुपसिंग चौधरी (वय २८, रा. रेणुकानगर, गंगाबाग, पारडी) याने नागपूरसह विविध गावांमध्ये गेल्या आठ वर्षांपासून अक्षरश: हैदोस घालत होता, अशी थरारक माहिती उघड झाली आहे. त्याने गेल्या सहा महिन्यात तीन तर २००९ मध्ये एक अशा चार हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. अनेकांच्या हत्येचा प्रयत्न केला असून, अनेकांवर अत्याचारही केले आहे. चोऱ्या , घरफोड्या, दरोड्यासारखे त्याच्यावर ३० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत तर, अनेक गुन्हे त्याने केले असले तरी त्याची पोलिसांत नोंदच नाही.टीव्हीवरील एखाद्या हिंसक मालिकेतील (सिरियल) थरारपटासारखाच थरारक घटनाक्रम खतरनाक छल्ला चौधरीच्या गुन्हेगारीचा आहे. वयाच्या बाराव्या वर्षी (२०१३ मध्ये) छल्लाने पहिला गुन्हा केला होता. त्यावेळी पोलिसांकडून फारशी कडक कारवाई झाली नाही. त्यामुळे छल्लातील गुन्हेगार निर्ढावत गेला. तो नुसता निर्ढावलाच नाही तर त्याच्यातील क्रूरता अन् विकृतीही वाढत गेली. छल्ला आधी लहानसहान चोºया करायचा. त्यानंतर नंदनवनमधील सत्यपाल आणि कैलास नागपुरे या दोन भावांची त्याला साथ मिळाली. ते चोºया, घरफोड्या, लुटमार करू लागले. त्यांनी दरोडेही घातले. अनेक सराईत गुंडांसोबत सलगी वाढल्यानंतर २००९ मध्ये छल्लाने पप्या देशभ्रतारच्या मदतीने वेलतूर(कुही)मध्ये एकाची हत्या केली. कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर छल्ला पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाला. त्याने लुटमार, दरोडे सुरू केले. दोन वर्षांपूर्वी त्याचा साथीदार सत्यपाल नागपुरेची भंडाºयात हत्या झाली. मात्र, छल्लाच्या गुन्हेगारी वृत्तीवर त्याचा परिणाम झाला नाही. त्याचा गुन्हेगारी अभिलेख लक्षात घेता २०१५ मध्ये पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीएची कारवाई केली. त्यानंतर काही दिवस त्याला येरवडाच्या कारागृहातही डांबण्यात आले. तेथून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात परतल्यानंतर छल्ला अधिकच क्रूर झाला.गुन्हेगारीच्या भाषेत येथील मध्यवर्ती कारागृहात त्याच्या नावाचा छल्ला (सिक्का) चालत होता. दरम्यान, जुन्या गुन्ह्यातील मालाच्या हिस्सेवाटणीवरून आणि टोळीच्या वर्चस्वातून छल्लाचा साथीदार आणि मृत सत्यपाल याचा भाऊ कैलास नागपुरेसोबत वाद झाला. त्यानंतर तो यावर्षीच्या जानेवारी महिन्यात कारागृहातून बाहेर आला. पुन्हा एका दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला कारागृहात डांबले. तेथून मार्चमध्ये बाहेर पडल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी सुरू केली. यावेळी तो कैलास नागपुरेचा काटा काढण्याच्या तयारीला लागला. एप्रिलच्या दुसऱ्या  आठवड्यातील एका सायंकाळी त्याने नागपुरेला रनाळा शिवारात दारू पिण्याच्या बहाण्याने नेले. तेथे दारूचे पेग रिचविल्यानंतर ध्यानीमनी नसताना छल्लाने बाजूचा दगड उचलून नागपुरेच्या डोक्यात हाणला. त्यानंतर त्याला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. तो अर्धमेला अवस्थेत असताना त्याला फरफटत बाजूच्या रेल्वेलाईनवर नेले. तेथे त्याच्या शरीरावरून रेल्वेगाडी जाईपर्यंत छल्ला बाजूला लपून बसला.घात करून अपघाताचा बनावनागपुरेच्या हत्येला त्यावेळी कामठी पोलिसांनी रेल्वे अपघात मानून प्रकरणाची फारशी चौकशी केली नाही. मात्र, पोलिसांच्या कार्यपद्धती चांगल्याप्रकारे ध्यानात आलेला खतरनाक छल्ला एका आठवड्यानंतर पुन्हा त्याच घटनास्थळ परिसरात (रनाळा शिवार) गेला. तिकडे पोलीस आले असेल काय, हे त्याला बघायचे होते. दिवसभर पोलिसांचा माग काढल्यानंतर त्याने परत बाजूला दारू पिणे सुरू केले. त्याचवेळी तेथे आरिफ अन्सारी हा युवक आला. तो कचरा (पन्नी) वेचत होता. त्याला बघून छल्लाची विकृती जागी झाली. त्याने त्याला खाली पाडून त्याच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. आरिफने जोरदार प्रतिकार केल्यामुळे बाजूचा दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला. तो ठार झाल्यानंतर त्याचा मृतदेह रेल्वेलाईनवर टाकून छल्ला पसार झाला. इकडे रेल्वेने आरिफचा मृतदेह छिन्नविच्छिन्न केला. घात करून अपघाताचा बनाव करणाºया छल्लाची पोल शवविच्छेदन अहवालात खुलली. आरिफची हत्या झाल्याचे डॉक्टरांनी नोंदवल्यामुळे कळमना पोलिसांनी त्यावेळी हत्येचा गुन्हा दाखल केला. परंतु छल्लाची गचांडी धरण्याचे कौशल्य पोलिसांना दाखवता आले नाही.अनेक गुन्ह्यांची तक्रारच नाहीया हत्येनंतर परत छल्लाने निगरगट्टपणे त्याच भागात चोरी-घरफोडी, लुटमारीसह गंभीर गुन्हे सुरू केले. अनेक गंभीर गुन्ह्यांची विविध कारणांमुळे पोलिसांकडे नोंदच नाही, अशीही धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे. क्रूरपणे हत्या करणाऱ्या  छल्लाला दुसरी एक विकृती आहे. तो दारूच्या नशेत सैतान बनतो. युवकांवर लैंगिक अत्याचार करीत होता. एप्रिल ते आॅक्टोबर दरम्यान त्याने अनेक मुले, युवकांवर अत्याचार केला आहे. बदनामी आणि दहशतीमुळे अनेकांनी त्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली नाही. त्याला अटक केल्यानंतर कळमना मार्केटमधील दोन पीडितांनी त्यांच्यावर छल्लाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे लकडगंज पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे आता ते दोन गुन्हे पुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा