शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातल्या सावनेरातील राम गणेश गडकरी स्मृतिस्थळे भग्नावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 10:50 IST

‘मराठीचे शेक्सपिअर’ म्हणून गौरव करण्यात आलेल्या राम गणेश गडकरी यांच्या स्मृती जपण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न झाला. मात्र त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिस्थळांना सध्या भग्नावस्था प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देआज ९९ वा स्मृतिदिन स्मारक, समाधीस्थळाकडे कायम दुर्लक्षसाहित्यप्रेमींमध्ये प्रचंड खदखदनाट्यगृहाचे दिवस पालटले

बाबा टेकाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसावनेर : अल्प आयुष्यात अजरामर साहित्यकृतीद्वारे मराठी साहित्यात राम गणेश गडकरी यांनी सर्वोच्च असे स्थान प्राप्त केले. नाटककार, विनोदकार, कवी म्हणून त्यांनी मराठी साहित्यात छाप पाडली. सावनेरनगरीत त्यांचे काही काळ वास्तव्य होते आणि अखेरचा श्वासही त्यांनी याच भूमीत घेतला. ‘मराठीचे शेक्सपिअर’ म्हणून गौरव करण्यात आलेल्या राम गणेश गडकरी यांच्या स्मृती जपण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न झाला. मात्र त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिस्थळांना सध्या भग्नावस्था प्राप्त झाली आहे. केवळ स्मृतिदिनी या स्मृतिस्थळांकडे लक्ष जाते, एरवी स्मारक असो वा समाधीस्थळ की नाट्यगृह... नेहमी त्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर असतो. एवढेच काय तर याच ठिकाणांच्या आड असामाजिक तत्त्वांचाही वावर असतो. ही स्थिती बदलावी, अशी रास्त अपेक्षा साहित्यवर्तुळातून करण्यात येत आहे.राम गणेश गडकरी यांचे अल्प काळ सावनेरात वास्तव्य होते. ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘राजसंन्यास’, ‘एकच प्याला’ ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती आहे. यापैकी ‘एकच प्याला’ने त्यांना वेगळ्या उंचीवर नेले. यासोबतच ‘वेड्यांचा बाजार’ आणि ‘भावबंधन’ हे अपूर्ण नाटकही त्यांच्या साहित्यकृतीमध्ये आहे. यातील ‘भावबंधन’ हे नाटक नंतर आचार्य अत्रे यांनी पूर्ण केले. केवळ ३४ वर्षे आयुष्य लाभलेल्या राम गणेश गडकरी यांनी २३ जानेवारी १९१९ मध्ये अखेरचा श्वास सावनेरात घेतला. मराठी साहित्यातील त्यांचे स्थान लक्षात घेता स्मृतिस्थळांच्या निर्मितीसाठी दरम्यानच्या काळात हालचाली झाल्या.ज्या घरात राम गणेश गडकरी यांनी अखेरचा श्वास घेतला, तेसुद्धा मोडकळीस आले. अखेर यासाठी साहित्यप्रेमींनी पुढाकार घेतल्याने पुरातत्त्व विभागाने ती इमारत ताब्यात घेतल्यानंतर स्थिती थोडी सुधारली. त्यांच्या नावाने नाट्यगृह बांधले. मात्र हे नाट्यगृह कधीच सुस्थितीत येऊ शकले नाही. साहित्य चोरी जाणे, खुर्च्यांची मोडतोड झालेली असे प्रकार वाढत गेले. नगर परिषदेने अखेर हालचाल केली आणि आजच्या घडीला नाट्यगृह कसेतरी उभे आहे. कधीतरी या नाट्यगृहात आता कार्यक्रमही होतात. समाधी स्थळावर तर नेहमी कुत्रे, डुकरांचा वावर असतो.राम गणेश गडकरी यांच्या स्मृती जपण्यासाठी नाट्यगृहाच्या रूपाने प्रयत्न झाला. कै. राम गणेश गडकरी नाट्यगृह बांधून त्याचे उद्घाटन ११ डिसेंबर १९८८ ला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीची काही वर्षे या नाट्यगृहात अनेक नाटकांचे प्रयोग झाले. मात्र या नाट्यगृहाला हळूहळू अवकळा येण्यास सुरुवात झाली आणि पाहता-पाहता हे नाट्यगृह खंडार बनले. दरम्यानच्या काळात नाट्यगृहाच्या खिडक्या, दारे तर सोडाच खुर्च्या, वीज मीटर, वीज तारा, लोखंडी सळाकी आणि इतर साहित्यांवर चोरट्यांनी हात साफ केला. त्यामुळे तेथे केवळ अवशेष उरले होते. एवढेच काय तर याच नाट्यगृहात चोरट्यांची ‘एकच प्याला’ची मैफल भरत असत. याबाबत साहित्यप्रेमींनी पाठपुरावा केला. प्रशासनानेही हालचाली वाढविल्या आणि पाहता - पाहता नाट्यगृह सुस्थितीत आले. तेथे सध्या चौकीदार नेमणुकीस आहे. आता या नाट्यगृहात अधूनमधून कार्यक्रम होतात.

टॅग्स :literatureसाहित्य