पावसाळी अधिवेशन नागपुरातच : गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:43 IST2018-05-23T23:42:24+5:302018-05-23T23:43:20+5:30

पावसाळी अधिवेशन नागपुरातच होईल, असे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

The rainy session in Nagpur: Girish Bapat | पावसाळी अधिवेशन नागपुरातच : गिरीश बापट

पावसाळी अधिवेशन नागपुरातच : गिरीश बापट

ठळक मुद्देप्रशासकीय तयारी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळी अधिवेशन नागपुरातच होईल, असे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
नागपूरला पावसाळी अधिवेशन घेण्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु ते खरेच होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. परंतु संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी पावसाळी अधिवेशन नागपुरातच होणार असल्याचे स्पष्ट करीत यावर पूर्णविराम लावला. मुंबई येथील आमदार निवासाचे काम सुरू आहे. त्यामुळे तिथे राहणे अवघड होईल. आताच आमदारांना भत्ता देण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळीसह हिवाळी अधिवेशनही नागपूरलाच होईल. मात्र यासंदर्भातील अधिकृत निर्णय नंतर होईल, असेही त्यांनी सांगितले. पावसाळी अधिवेशन ठरल्याप्रमाणे ४ जुलैपासून नागपूरलाच होणार आहे. यासाठी मित्रपक्षांसह सर्वांशी बोलू. गुण्यागोविंदात अधिवेशन पार पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पावसाळी अधिवेशन पहिल्यांदाच नागपूरला होत असले तरी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The rainy session in Nagpur: Girish Bapat