Rain with sudden thunderstorms in Nagpur | नागपुरात  अचानक वादळासह पाऊस

नागपुरात  अचानक वादळासह पाऊस

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : शहरात सायंकाळी अचानक वादळासह पाऊस पडला. शहरातील बहुतांश भागात पाऊस झाला.
शनिवारी दिवसभर कडक उन होते. सायंकाळी अचानक हवामानात बदल झाला आणि वादळ वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

सुरुवातीला सायंकाळी ६ वाजता झालेला पाऊस १० मिनिटे सुरू होता. त्यानंतर पुन्हा रात्री ७.४५ वाजता पाऊस पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे लोक चिंतेत पडले आहेत.

Web Title: Rain with sudden thunderstorms in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.