शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

विद्यार्थ्यांवर गुणांचा ‘पाऊस’: नागपूर जिल्ह्याचा निकाल २२ टक्क्यांनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 23:24 IST

‘कोरोना’च्या प्रकोपामुळे अगोदरच निकालाला उशीर झाला असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र बुधवारी निकाल जाहीर झाला अन् विद्यार्थ्यांवर गुणांचा अक्षरश: वर्षावच झाला.

ठळक मुद्देहिमाश्री गावंडेला १०० टक्के : गुणवंतांमध्ये मुलींचीच बाजी

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : ‘कोरोना’च्या प्रकोपामुळे अगोदरच निकालाला उशीर झाला असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र बुधवारी निकाल जाहीर झाला अन् विद्यार्थ्यांवर गुणांचा अक्षरश: वर्षावच झाला. नागपूर विभागासह जिल्ह्याच्या निकालातदेखील सुधारणा झाली. यंदा जिल्ह्याचा निकाल चक्क ९४.६६ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षी हाच निकाल ७१.७४ टक्के इतका लागला होता. यंदा निकालात २२.९२ टक्क्यांची वाढ झाली आहे.यंदाही उपराजधानीत उत्तीर्णांमध्ये विद्यार्थिनींचाच वरचष्मा दिसून आला. जर विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त गुणासह टक्केवारी लक्षात घेतली तर साऊथ पॉर्इंट शाळेची विद्यार्थिनी हिमाश्री गावंडे हिला १०० टक्के गुण मिळाले आहेत. यात संगीताच्या ८ गुणांचादेखील समावेश आहे. याशिवाय कुठलेही अतिरिक्त गुण न पकडता जे.पी. इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी समिक्षा पराते हिला ९९.४० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. सोमलवार हायस्कूल (निकालस) येथील वरेण्य पौनीकर या विद्यार्थ्याला क्रीडा गुणांसह ९९.८ टक्के तर तेथीलच राधिका गभने हिला अतिरिक्त गुणांसह ९९.४ टक्के गुण मिळाले आहेत. सोमलवार हायस्कूल (रामदासपेठ) येथील विद्यार्थिनी जुई क्षीरसागर हिला ९९.२० टक्के गुण प्राप्त झाले.नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर ३० हजार ३२१ पैकी २९ हजार २३१ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९६.४१ टक्के इतके आहे. तर जिल्ह्यातून ९२.९५ टक्के मुले उत्तीर्ण झाली.शहरात टक्के उत्तीर्णनागपूर शहरात १८ हजार १०४ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. त्यापैकी १७ हजार ५१२ म्हणजेच ९६.७३ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. तर १७ हजार ६१३ पैकी १६ हजार ४२५ (९३.२५ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शहरातील एकूण उत्तीर्णांचे प्रमाण हे ९५.०२ टक्के इतके आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही टक्केवारी २०.७५ टक्क्यांनी अधिक आहे.जिल्ह्यातील उत्तीर्णांची टक्केवारी

              सहभागी      उत्तीर्ण         टक्केवारीविद्यार्थी ३१,०८६        २८,८९५      ९२.९५विद्यार्थिनी ३०,३२१   २९,२३१       ९६.४१एकूण ६१,४०७         ५८,१२६      ९४.६६हिमांशु बोकडे दिव्यांगांमधून ‘टॉप’शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार कुर्वेज न्यू मॉडेल हायस्कूलचा विद्यार्थी हिमांशु बोकडे हा ९२ टक्के गुणांसह प्रथम आला आहे तर याच शाळेची वेदिका गेडाम हिला ८९ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. आदित्य पाटील याला ८७ टक्के गुण मिळाले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालnagpurनागपूर