शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेल्वेच्या सफाई कामगारांनी केले कामबंद आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 00:43 IST

रेल्वेत कार्यरत खासगी ठेकेदाराच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिवाळीच्या दिवशी कामबंद आंदोलन केले.

ठळक मुद्देमागण्या पूर्ण न झाल्यास रेल्वे रोकोचा इशारा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वेत कार्यरत खासगी ठेकेदाराच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिवाळीच्या दिवशी कामबंद आंदोलन केले. काँग्रेसचे बंटी शेळके यांनी हस्तक्षेप करून ३० ऑक्टोबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास रेल्वे रोको करण्यात येईल, असे सांगितल्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात खासगी ठेकेदाराचे २८६ सफाई कामगार काम करीत आहेत. त्यांचे आर्थिक शोषण करण्यात येत आहे. त्यांना नियमानुसार मजुरी देण्यात येत नाही. दिवाळीत ७,३०० रुपये बोनस देण्याचे आश्वासन देऊनही बोनस देण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर त्यांचे एटीएमही ठेकेदाराने आपल्या ताब्यात घेतले आहे. ठेकेदार एटीएमद्वारे त्यांच्या खात्यातील पैसे काढून केवळ कामगारांना ५ ते ६ हजार रुपये देत असल्याचा आरोप आहे. कामगारांचा पीएफ कपात करूनही त्यांना पीएफ क्रमांक देण्यात आला नाही. आरोग्य विमा नसल्यामुळे कामगार आजारी पडल्यानंतर त्यांची गैरसोय होते. त्यांना युनिफॉर्म, मास्क देण्यात येत नसल्यामुळे ते नेहमीच आजारी पडतात. सफाई कामगारांच्या आंदोलनाची माहिती मिळताच काँग्रेसचे बंटी शेळके रेल्वेस्थानकावर पोहोचले. त्यांनी कामगारांना मिठाई देऊन ‘डीआरएम’ कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलन केले. स्टेशन संचालक दिनेश नागदेवे यांना भेटून ३० ऑक्टोबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास रेल्वे रोको करण्याचा इशारा दिला. कामगारांचे शोषण बंद न केल्यास डीआरएम कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी नगरसेविका नेहा निकोसे, रौनक चौधरी, तौसिफ खान, मोईज शेख, स्वप्निल बावनकर, राकेश निकोसे, अक्षय घाटोळे, सागर चौहान, मन्सूर भाटी, वैभव संभारे, स्वप्निल ढोके, पूजक मदने आणि सफाई कामगार उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेEmployeeकर्मचारीagitationआंदोलनnagpurनागपूर