रेल्वेचे वेळापत्रक बिघडले !
By Admin | Updated: January 2, 2015 00:53 IST2015-01-02T00:53:34+5:302015-01-02T00:53:34+5:30
दाट धुक्यामुळे विस्कळीत झालेली दिल्ली आणि इतर मार्गावरील वाहतूक अद्यापही सुरळीत झालेली नाही. मागील दहा दिवसांपासून यामुळे प्रवासी वैतागल्याची स्थिती आहे. दरम्यान

रेल्वेचे वेळापत्रक बिघडले !
धुक्याचा परिणाम : वेटिंग रूम झाल्या फुल्ल
नागपूर : दाट धुक्यामुळे विस्कळीत झालेली दिल्ली आणि इतर मार्गावरील वाहतूक अद्यापही सुरळीत झालेली नाही. मागील दहा दिवसांपासून यामुळे प्रवासी वैतागल्याची स्थिती आहे. दरम्यान गुरुवारी ११ रेल्वेगाड्या ४ ते १७ तास विलंबाने धावत होत्या.
हिवाळ्यात दाट धुके पडत असल्यामुळे लोकोपायलटला समोरील सिग्नल दिसत नाही. अशा परिस्थितीत रेल्वेगाडी चालविणे म्हणजे अपघाताला निमंत्रण ठरते. त्यामुळे या कालावधीत रेल्वेगाड्या चालविण्यात येत नाहीत. परंतू यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. गुरुवारी अनेक रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावत होत्या. दरम्यान उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यात १८२३८ अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस १४ तास, १२४१० हजरत निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस ९ तास, १६०३२ जम्मूतावी-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस ६.४० तास, १२६१५ चेन्नई-नवी दिल्ली ग्रँड ट्रंक एक्स्प्रेस १७ तास, १२६२१ चेन्नई-नवी दिल्ली तामिळनाडू एक्स्प्रेस १० तास, १२६२२ नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस ३.४५ तास, १२७२३ हैदराबाद-नवी दिल्ली एपी एक्स्प्रेस ७.३० तास, १२७२२ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस २.३० तास, १२२९६ पटणा-बंगळुर संघमित्रा एक्स्प्रेस ४.३० तास, १२६५० हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्कक्रांती एक्स्प्रेस ४५ मिनिटे आणि १२८०७ विशाखापट्टणम-हजरत निजामुद्दीन समता एक्स्प्रेस १ तास उशिराने धावत आहे. (प्रतिनिधी)
वेळेची खात्री करूनच निघा
रेल्वे प्रवासी रेल्वेगाड्यांची वाट पाहून वैतागल्याची स्थिती आहे. यामुळे रेल्वेस्थानकावरील वेटिंग रूम फुल्ल झाल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून अशीच स्थिती असल्याने प्रवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत.प्रवाशांनी १३९ टोल फ्री किंवा रेल्वेस्थानकावर खात्री करूनच त्रास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.