रेल्वे प्रवाशाचे एटीएम चोरुन १.७६ लाख उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 23:30 IST2019-09-18T23:28:19+5:302019-09-18T23:30:39+5:30

रेल्वेगाडीने जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या हँडबॅगमधून अज्ञात आरोपीने पर्स चोरून त्यातील तीन एटीएमच्या साहाय्याने १ लाख ७६ हजार ६०० रुपये उडविल्याची घटना घडली आहे.

Railway passenger's ATM was stolen, withdraw 1.76 Rs. | रेल्वे प्रवाशाचे एटीएम चोरुन १.७६ लाख उडविले

रेल्वे प्रवाशाचे एटीएम चोरुन १.७६ लाख उडविले

लोकमत  न्यूज  नेटवर्क  
नागपूर : रेल्वेगाडीने जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या हँडबॅगमधून अज्ञात आरोपीने पर्स चोरून त्यातील तीन एटीएमच्या साहाय्याने १ लाख ७६ हजार ६०० रुपये उडविल्याची घटना घडली आहे. सीताबर्डी येथील अनिता बलराम फुलवानी (६३) निजामुद्दीनवरून नागपूरला येण्यासाठी रेल्वेगाडी क्रमांक १२४४२ निजामुद्दीन-बिलासपूर राजधानी एक्स्प्रेसमध्ये सोमवारी प्रवास करीत होत्या. अज्ञात आरोपीने त्यांच्या हँडबॅगमधील लहान पर्स चोरी केली. त्यात वेगवेगळ्या बँकाचे तीन एटीएम कार्ड होते. अनिता फुलवानी यांनी तिन्ही एटीएम कार्डचे पासवर्ड त्याच्या मागे लिहिले होते. त्याचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने एका बँकेतून ६१ हजार, दुसऱ्या बँकेतून ९१ हजार आणि तिसऱ्या बँकेतून २४ हजार ६०० रुपये असे एकूण १.७६ लाख रूपये काढून घेतले. पैसे काढल्याची माहिती मिळताच त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Web Title: Railway passenger's ATM was stolen, withdraw 1.76 Rs.