नागपुरातील कुख्यात मेश्रामच्या सट्टा अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:53 IST2018-02-06T00:48:23+5:302018-02-06T00:53:11+5:30

पोलिसांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाट सट्टा अड्डा चालविणारा अजनीतील कुख्यात सट्टेबाज चंद्रमणी मेश्राम याच्या अड्ड्यावर पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी सोमवारी रात्री आपल्या सहकाऱ्यांसह छापा मारला. पोलिसांनी या ठिकाणी मेश्राम आणि त्याच्या सहा साथीदारांना रंगेहात पकडून रोख तसेच सट्टापट्टीसह ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Raid on satta dent of notorious Meshram of Nagpur | नागपुरातील कुख्यात मेश्रामच्या सट्टा अड्ड्यावर छापा

नागपुरातील कुख्यात मेश्रामच्या सट्टा अड्ड्यावर छापा

ठळक मुद्देपोलीस उपायुक्तांची कारवाई : सात आरोपी सापडलेसट्टापट्टीसह ५० हजारांचे साहित्य जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाट सट्टा अड्डा चालविणारा अजनीतील कुख्यात सट्टेबाज चंद्रमणी मेश्राम याच्या अड्ड्यावर पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी सोमवारी रात्री आपल्या सहकाऱ्यांसह छापा मारला. पोलिसांनी या ठिकाणी मेश्राम आणि त्याच्या सहा साथीदारांना रंगेहात पकडून रोख तसेच सट्टापट्टीसह ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
कुख्यात मेश्राम हा गेल्या अनेक वर्षांपासून अवैध धंदे आणि सट्टा जुगारात सक्रिय आहे. या धंद्यातून तो महिन्याला लाखोंची उलाढाल करतो. मेश्रामचे अनेक पोलिसांसोबत लेण्यादेण्याचे व्यवहार असल्याची ओरड आहे. त्यामुळे त्याच्या सट्टा-जुगार अड्ड्यावर पोलीस कारवाई करीत नाही. चुकून एखादवेळी छापा मारला गेला तर ती कारवाई जुजबी स्वरूपाची असते. परिमंडळ ४चा पदभार
स्वीकारल्यानंतर पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी सोमवारी रात्री ७.४५ च्या सुमारास अजनीचे ठाणेदार शैलेष संख्ये आणि सहकाऱ्यांना सोबत घेतले आणि योजनाबद्ध पद्धतीने चंद्रमणी मेश्रामच्या अड्ड्यावर छापा घातला. यावेळी तेथे मेश्राम तसेच प्रमोद कारेमोरे, रामराव बर्वे, राकेश चांदपूरकर, किशोर कळमकर, गजानन ठेंगणे, धरम मेश्राम सट्टा घेताना रंगेहात सापडले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून रोख आणि अन्य चीजवस्तूंसह ५० हजारांचे साहित्य जप्त केले. मेश्राम आणि साथीदारांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
संधीच मिळाली नाही
मेश्रामचे अनेक पोलिसांसोबत घेण्यादेण्याचे व्यवहार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एखादवेळी कारवाईची योजना आखली गेल्यास मेश्रामला पोलिसांची कारवाई होण्यापूर्वीच माहिती मिळते. ही बाब ध्यानात घेऊन उपायुक्त भरणे यांनी कारवाईची भनकच लागू दिली नाही. त्यामुळे सट्टा घेताना मेश्राम आणि त्याचे साथीदार पोलिसांच्या हाती लागले.

Web Title: Raid on satta dent of notorious Meshram of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.