नागपुरातील  कुख्यात डल्लू सरदारच्या जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:46 IST2018-07-10T00:44:33+5:302018-07-10T00:46:30+5:30

कुख्यात गुंड डल्लू सरदार ऊर्फ नरेंद्रसिंग नानकसिंग दिगवा याच्या आॅटो डीलच्या कार्यालयातील जुगार अड्ड्यावर सोमवारी दुपारी पाचपावली पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात पोलिसांनी १८०० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करून डल्लू सरदार, हरदीपसिंग सैनी, बलदेवसिंग हरजितसिंग, रामेश्वर स्वामी, भारत काळबांडे आणि सौरभ बोरकर या सहा जणांना अटक केली.

Raid on the notorious Dallu Sardar's gambling den in Nagpur | नागपुरातील  कुख्यात डल्लू सरदारच्या जुगार अड्ड्यावर छापा

नागपुरातील  कुख्यात डल्लू सरदारच्या जुगार अड्ड्यावर छापा

ठळक मुद्देआॅटो डीलच्या कार्यालयात जुगार अड्डा

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : कुख्यात गुंड डल्लू सरदार ऊर्फ नरेंद्रसिंग नानकसिंग दिगवा याच्या आॅटो डीलच्या कार्यालयातील जुगार अड्ड्यावर सोमवारी दुपारी पाचपावली पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात पोलिसांनी १८०० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करून डल्लू सरदार, हरदीपसिंग सैनी, बलदेवसिंग हरजितसिंग, रामेश्वर स्वामी, भारत काळबांडे आणि सौरभ बोरकर या सहा जणांना अटक केली.
कुख्यात डल्लू सरदारने सूरज यादव याची हत्या केली होती. डल्लू आणि साथीदारांविरुद्ध या गुन्ह्यात पोलिसांनी मोक्का लावला होता. त्याला आणि साथीदारांना न्यायालयाने या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. बरेच दिवस कारावास भोगल्यानंतर काही दिवसांपूर्वीच तो संचित रजेवर बाहेर आला. येता येताच डल्लूने अवैध धंदे, खंडणी वसुली सुरू केली. त्याच्या कामठी मार्गावरील आॅटो डीलच्या कार्यालयात जुगार अड्डा भरविला जात असल्याची माहिती कळाल्यानंतर, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास छापा घातला. या छाप्यात केवळ १८०० रुपये मिळाल्याचे ठाणेदार हिवरे यांनी सांगितले. ते आणि जुगाराचे साहित्य जप्त करून पोलिसांनी डल्लूसह उपरोक्त जुगाऱ्यांना अटक केली.

Web Title: Raid on the notorious Dallu Sardar's gambling den in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.