मसाजपार्लरच्या आड कुंटणखाना : प्रतापनगर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 00:43 IST2021-05-07T00:42:10+5:302021-05-07T00:43:33+5:30
Raid on massage parlor मसाजपार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर प्रतापनगर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी छापा घातला. यावेळी तेथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन मुली, तसेच त्यांचा दलाल दयालदास लाहेरे, अशा तिघांना पकडण्यात आले.

मसाजपार्लरच्या आड कुंटणखाना : प्रतापनगर पोलिसांचा छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मसाजपार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर प्रतापनगर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी छापा घातला. यावेळी तेथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन मुली, तसेच त्यांचा दलाल दयालदास लाहेरे, अशा तिघांना पकडण्यात आले.
गोपालनगर तिसरा बसस्थानकाजवळ ग्लोबल टच नॅचरोपॅथी सेंटर आणि मसाजपार्लरच्या नावाखाली लाहेरेने अनेक दिवसांपासून कुंटणखाना सुरू केला होता. येथे वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती प्रतापनगर पोलिसांना मिळाली. त्यावरून द्वितीय निरीक्षक विद्या जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गुरुवारी सायंकाळी बनावट ग्राहक पाठवून येथे छापा घातला. यावेळी वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिला, तसेच दलाल लाहेरे पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून काही उत्तेजक औषधी, तसेच आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले. रात्री ११ वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियासुरू होती.