माेहफुलांच्या दारू भट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:08 IST2021-04-19T04:08:28+5:302021-04-19T04:08:28+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने लाॅकडाऊनची घाेषणा केली आणि अवैध दारू विक्री आणि माेहफुलांची ...

माेहफुलांच्या दारू भट्टीवर धाड
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने लाॅकडाऊनची घाेषणा केली आणि अवैध दारू विक्री आणि माेहफुलांची दारू काढण्याला उधाण आले. त्यातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बनेरा शिवारातील माेहफुलांच्या दारू भट्टीवर धाड टाकली. यात दारू काढणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ३ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. १७) रात्री करण्यात आली.
एकनाथ संताेष भलावी (४२), मुरलीधर गाेविंदा शेंद्रे (४४) व अमाेल ईश्वर मरसकाेल्हे (२३) तिघेही रा. बनेरा, ता. पारशिवनी अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शनिवारी रात्री पारशिवनी परिसरात गस्तीवर हाेते. दरम्यान, त्यांना बनाेरा शिवारात माेहफुलांची दारू काढली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या शिवाराची पाहणी केली. त्यांना या शिवारातील झुडपांमध्ये माेहफुलांची दारू भट्टी आढळून येताच त्यांनी लगेच धाड टाकली.
यात पाेलिसांनी दारू काढणाऱ्या तिघांना ताब्यात घेत अटक केेली. त्यांच्याकडून ४० हजार ५०० रुपयांची २७० लिटर माेहफुलांची दारू, २ लाख ४० हजार रुपयांचा २,४०० लिटर माेहफुलांचा सडवा (दारू तयार करण्याठी वापरले जाणारे रसायन) व २५ हजार ५०० रुपये किमतीचे दारू गाळण्यासाठी वापरले जाणारे विविध साहित्य असा एकूण ३ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.
याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते, सहायक फाैजदार साहेबराव बहाळे, हवालदार ज्ञानेश्वर राऊत, महेश जाधव, दिनेश आधापुरे, राजेश रेेवतकर, वीरेंद्र नरड, अमाेल वाघ, विपीन गायधने, अमाेल कुथे यांच्या पथकाने केली.