नागपुरात कल्याण मटका अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 23:03 IST2020-07-23T23:00:12+5:302020-07-23T23:03:37+5:30
गुन्हे शाखेच्या पथकाने गिट्टीखदानमधील एका मटका अड्ड्यावर छापा घालून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख आणि मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

नागपुरात कल्याण मटका अड्ड्यावर छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने गिट्टीखदानमधील एका मटका अड्ड्यावर छापा घालून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख आणि मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. विजय ऊर्फ विकी नामदेव गेडाम (रा. हजारीपहाड), श्रीकांत रवींद्र मारवे (रा. जुनी मंगळवारी) आणि सनी भानुदास गौरखेडे (रा. हजारीपहाड) असे मटका अड्डा चालविणाऱ्यांची नावे आहेत.
गिट्टीखदानमधील शिवाजी चौकात गौरखेडे कॉम्प्लेक्सकडे जाणाऱ्या मार्गावर या तिघांनी हिरवी नेट बांधून आतमध्ये कल्याण मटका सुरू केला होता. तेथे हे तिघे मटका अड्डा चालवीत असल्याची माहिती कळताच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी तेथे छापा घातला. तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख २४२० रुपये तसेच साहित्य जप्त केले. उपरोक्त तिघांना जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.