शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

येरखेड्यातील जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : नवीन कामठी पाेलिसांनी न्यू येरखेडा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पाच जुगाऱ्यांना ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : नवीन कामठी पाेलिसांनी न्यू येरखेडा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून राेख रक्कम, दुचाकी वाहने असा एकूण ३ लाख ६२ हजार २३५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी (दि.५) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये शहनाज अख्तर खलील उर रहमान (२१, रा. इस्माईलपुरा, कामठी), माेहम्मद नदीम माेहम्मद आरिफ (२१, रा. नया गाेदाम, कामठी), माेहम्मद जुबेर माेहम्मद सलीम (२४, रा. बुनकर काॅलनी), माेहम्मद साजिद माेहम्मद अस्लम (३१) व माेहम्मद युनूस माेहम्मद अनिस (३५) दाेन्ही रा. इस्माईलपुरा, कामठी यांचा समावेश आहे. न्यू येरखेडा भागातील नाला काठालगतच्या माेकळ्या जागेत जुगार खेळला जात असल्याची गुप्त सूचना पाेलिसांना मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी सापळा रचून सदर जुगार अड्ड्यावर धाड टाकली असता, आराेपी ताशत्त्यांवर पैशांचा जुगार खेळताना आढळून आले. पाेलिसांनी पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेत अटक केली, तर काही आराेपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

या कारवाईत राेख ५,७३५ रुपये, ३७,५०० रुपये किमतीचे पाच माेबाईल हॅण्डसेट तसेच सहा दुचाकी वाहने (क्रमांक एमएच-४०/बीपी-७३८७, एमएच-४०/बीएस-१३१०, एमएच-३१/सीई-९७०८, एमएच-३१/एई-९०८६, एमएच-४०/बीक्यू-९२४९ व एमएच-४०/एएस-११९०) व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण ३ लाख ६२ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नवीन कामठी पाेलिसांनी १२ मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपींना अटक केली आहे. ही कारवाई पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल, सहायक पाेलीस उपायुक्त राेशन पंडित, ठाणेदार संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, हवालदार मनाेहर राऊत, प्रमाेद वाघ, सुरेंद्र शेंडे, ललित शेंडे, अनिल बाळराजे, नीलेश यादव, शंकर खंडाते, मयूर बन्साेड यांच्या पथकाने केली.