शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
4
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
9
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
10
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
11
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
12
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
13
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
14
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
15
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
16
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
17
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
18
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
19
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
20
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील चील एन ग्रीलवर छापा : बारपुढे बीअर विकत होते कर्मचारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 21:46 IST

गुन्हे शाखा पथकाने गुरुवारी रात्री सदर येथील चील एन ग्रील बारच्या कर्मचाऱ्यांना बीअर विकताना रंगेहात पकडले. हा बार सदर पोलीस ठाण्यापासून थोड्याच अंतरावर आहे.

ठळक मुद्देदोघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखा पथकाने गुरुवारी रात्री सदर येथील चील एन ग्रील बारच्या कर्मचाऱ्यांना बीअर विकताना रंगेहात पकडले. हा बार सदर पोलीस ठाण्यापासून थोड्याच अंतरावर आहे. परिणामी, या गुन्ह्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. या कारवाईमुळे दारूची अवैध विक्री करणाऱ्या बार संचालकांचे धाबे दणाणले आहे.बारचे कर्मचारी अरविंद तुळसीराम उमरेडकर (२६) व सागर शंकर मोईनकर (२४) यांना अटक करण्यात आली आहे. उमरेडकर इतवारी तर, मोईनकर सिव्हिल लाईन्स येथील रहिवासी आहे. हे कर्मचारी दारू विकत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार त्रिपाठी यांनी सापळा रचला. त्यानंतर छापा टाकून आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. आरोपींनी बारच्या तिसऱ्या माळ्यावर बीअरच्या बॉटल्स लपवून ठेवल्या होत्या. अबकारी विभागाने बारला सील लावले होते. ते सील तोडण्यात आले होते. पोलिसांनी या कारवाईची अबकारी विभागाला माहिती दिली. त्यामुळे अबकारी विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहचले होते.आरोपींना सदर पोलीस ठाण्यात नेल्यानंतर गुन्हा नोंदविण्यासाठी गुन्हे शाखेला घाम गाळावा लागला. सदर पोलीस गुन्हे शाखेच्या कारवाईत त्रुटी शोधत होते. बारशी जुळलेला एक पोलीस कर्मचारीही सक्रिय झाला होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला. परिणामी, सदर पोलिसांनी साथरोग कायदा व दारूबंदी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला व २३८० रुपयांची दारू जप्त केली.लायसन्स नसताना सुरू होते मेडिकल स्टोअर्सअवैधरीत्या बीअर विकणाऱ्या कंचन मेडिकल स्टोअर्सचा संचालक बंटी गुप्ता हा लायसन्सची मुदत जुलै-२०१९ मध्ये संपली असतानाही हे दुकान चालवीत होता. पोलिसांच्या कारवाईनंतर ही बाब पुढे आली. गुप्ताने लायसन्सचे नूतनीकरण केले नाही. एफडीएदेखील गप्प बसले होते. पोलीस कारवाईचा अहवाल मिळाल्यानंतर त्यांनी हालचाल केली व गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर गुप्ताविरुद्ध औषधी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला.मदिरा बारचे लायसन्स रद्दअबकारी विभागाने मदिरा बारचे लायसन्स रद्द केले आहे. हा बार सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. पाच वर्षापूर्वी बार गर्ल नाचवल्यामुळे बारचे लायसन्स रद्द करण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशामुळे या बारला पुन्हा लायसन्स मिळाले. त्यानंतरही बारवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली होती. ताज्या कारवाईनंतर गणेशपेठ पोलिसांनी बारचे लायसन्स रद्द करण्याची शिफारस केली होती. मेयो रुग्णालय चौक काही महिन्यांपासून दारू व अमली पदार्थ तस्करीचे ठिकाण झाले आहे.

टॅग्स :raidधाडliquor banदारूबंदी