नागपुरात अवैध दारू निर्मिती करणाऱ्या १७ ठिकाणावर धाड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:37 AM2019-10-11T00:37:41+5:302019-10-11T00:39:35+5:30

अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या विभागातील १७ ठिकाणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी चार दुचाकी वाहनासह २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

A raid on 17 places producing illegal alcohol in Nagpur | नागपुरात अवैध दारू निर्मिती करणाऱ्या १७ ठिकाणावर धाड 

नागपुरात अवैध दारू निर्मिती करणाऱ्या १७ ठिकाणावर धाड 

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या विभागातील १७ ठिकाणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी चार दुचाकी वाहनासह २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातच १६ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातंर्गत कार्यवाही देखील करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणूक २०१९ आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तसेच २ ते ८ ऑक्टोबर २०१९ महात्मा गांधी सप्ताहाच्या (कोरडा दिवस) निमित्ताने दारूबंदी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, अंमलबजावणी व दक्षता संचालक उषा वर्मा, विभागीय उपायुक्त मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक सुहास दळवी व त्यांच्या चमूने ही कारवाई केली.
विदर्भातील कोणत्याही ठिकाणी अवैध मद्य निर्मिती, साठा अथवा विक्री आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश निरीक्षक सुहास दळवी यांनी दिले आहे.

Web Title: A raid on 17 places producing illegal alcohol in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.